Thursday, March 13, 2025
Homeनगरजात वैधता प्रमाणपत्राबाबत आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहीम

जात वैधता प्रमाणपत्राबाबत आजपासून विशेष त्रुटी पुर्तता मोहीम

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची माहिती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने मागासवर्गीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 14 ते 28 नोव्हेंबर या कालावधीसाठी विशेष त्रुटी पुर्तता मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेला विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षामधील एसईबीसी, इमाव व इतर राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छुक आणि जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अहिल्यानगर येथील कार्यालयात प्रस्ताव दाखल करून पावतीच्या आधारे प्रवेश निश्चित केल्यांनतर अद्यापपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या सर्व उमेदवारांसाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहिल्यानगर कार्यालयातील चौकशी कक्षाचे जवळ विशेष त्रुटी पूर्तता मोहीम कक्ष तयार करण्यात आलेला आहे. अर्जदार विद्यार्थ्यांनी ई-मेल वर समितीकडून कळविण्यात आलेल्या त्रुटींची पुर्तता करण्यासाठी आपल्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जाची पावती तसेच जाती दावा सिध्द करणार्‍या महसुली तसेच शालेय सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात उपस्थित रहावे आणि आपल्या प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करावी. त्रुटी पूर्तता केलेल्या प्रकरणांवर समितीकडून तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्रुटी पूर्ततेअभावी प्रकरणे अर्जदार स्तरावर प्रलंबित राहिल्यास त्यास अर्जदार स्वतः जबाबदार असेल.

या विशेष मोहिमेमध्ये अर्जदार यांनी आपआपले जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांची त्रुटी पुर्तता करून करावी, जेणेकरून संबंधित अर्जदार यांना वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणे समितीस सुलभ होईल, असेही समितीकडून कळविण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...