Thursday, August 20, 2026
HomeनाशिकNashik Sinnar News : जलसंधारण सचिवांकडून सिन्नर तालुक्यातील पुरचाऱ्यांची पाहणी

Nashik Sinnar News : जलसंधारण सचिवांकडून सिन्नर तालुक्यातील पुरचाऱ्यांची पाहणी

नाशिक | Nashik

शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर आणि मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी २६ जुलै रोजी सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) कुंदेवाडी ते सायाळे व खोपडी ते मिरगाव पुरचाऱ्यांची तसेच को. प. बंधारा देवपूर (कंभळाचे झाड) या कामाची क्षेत्रीय पाहणी केली व अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान जलसंधारणाच्या कामांमुळे (Work) झालेला सकारात्मक परिणाम, कामांची गुणवत्ता तसेच नियोजनबद्ध अंमलबजावणी याबाबत सचिव पापळकर यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisement -

भविष्यातही याच दर्जाची गुणवत्तापूर्ण कामे करून जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बंदिस्त पुर चारी ही जलसंधारण विभागाची (Water Conservation Department) पहिली योजना असुन अशा योजनांमुळे पाणी शेवटच्या घटकापर्यंत अतिशय कमी वेळात पोहोचते म्हणुन भविष्यात अशा योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सुचना दिल्या. ही योजना भविष्यात लाभ धारकांकडून हाताळावी याकरिता अभ्यासपूर्वक प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी विभागाला सूचित केले.

या क्षेत्रीय पाहणीदरम्यान मुख्य अभियंता गिते यांनीही कामांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत यापुढे देखील सर्व कामे अधिक गुणवत्तापूर्वक पूर्ण करावे याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन खंबाईत, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, कंत्राटदार किरण पाटील उपस्थित होते. पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी विविध कामांची माहिती सादर केली व जलसंधारणाच्या माध्यमातून परिसरात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली. जलसंधारणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा क्षेत्रीय पाहण्या मार्गदर्शक ठरत असून, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख कामांना अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

पुरचारी कुंदेवाडी ते सायाळे
१) ३६ किलोमीटर लांबी
२) आरक्षित पाणी-१०५ दशलक्ष घनफूट
३) सिंचनाला लाभ-२४८ हेक्टर
४) विहिरींना लाभ-४००

गावे-कुंदेवाडी, गुरेवाडी, हबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, सुरेगाव , भोकणी, दोडी, मानोरी, कणकोरी, नि-हाळे, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, सायाळे, चोरकौठे.

खोपडी ते मिरगाव कालवा
१) २५ किलोमीटर लांबी
२) आरक्षित पाणी-११७ दशलक्ष घनफूट
३) सिंचनाला लाभ-२५० हेक्टर
४) विहिरींना लाभ-२५०

गावे – खोपडी बु., फर्दापूर, धारणगाव, देवपूर, पंचाळे, शिंदेवाडी, पांगरी, पिंपळगाव, शहा, मिठसागरे, पिंपरवाडी, मिरगाव, कोळगावमाळ.

ताज्या बातम्या

आडगाव भूसंपादन प्रकरणात मनपाला मोठा झटका; मनपाचे बँक खाते सील करण्याचे...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने नाशिक महापालिकेला मोठा धक्का दिला आहे. जमीनमालकाला मंजूर झालेला सुमारे १८ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला अदा...