Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइगतपुरीत सीबीआयची मोठी कारवाई

इगतपुरीत सीबीआयची मोठी कारवाई

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

- Advertisement -

सीबीआय पथकाने ऑनलाईन फसवणुकीच्या आरोपाखाली इगतपुरीतील एका पंचतारांकीत हॉटेलात भाड्याने घेतलेल्या जागेत काही व्यक्तींकडून चालवणाऱ्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये धाड मारून या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

YouTube video player

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सदर छाप्यामध्ये अधिकाऱ्यांच्या पथकाने सात अलिशान गाड्यांसह १ कोटीहून अधिक रोकड, सोने, लॅपटॉप, मोबाईल आदि जप्त केले आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने यासंदर्भात प्रसृत केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या बोगस कॉल सेंटरमार्फत अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशांतील लोकांनाही गंडा घालण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे. संशयित आरोपींनी त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स तसेच क्रिप्टो करन्सी नावाखाली अवैध पैसे देखील उकळले. हे रॅकेट चालवण्यासाठी एकूण ६० ऑपरेटर्संना कंपनीत भरती केले होते, ज्यामध्ये डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...