Thursday, May 2, 2024
Homeजळगावसीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये आनंदोत्सव

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये आनंदोत्सव

जळगाव । jalgaon

सीबीएसई बोर्ड (CBSE Board Class X) दहावीचा शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर (Result declared online) झाला. परीक्षेचा निकाल पाहताच विद्यार्थ्यांसह (students) पालकांमध्येही (parents) आनंदाचे वातावरण (happy atmosphere) दिसून आले. शहरातील दहावी सी.बी.एस.ई.परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूल, ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम स्कूल, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवित शंभर टक्के निकालाची परंपरा कायम (tradition of results continues) ठेवली आहे.

- Advertisement -

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून यात काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे 100 टक्के निकाल लागला आहे. सर्व 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 25 विद्यार्थ्यांना 90टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले असून अर्चित राहुल पाटील हा विद्यार्थी शाळेतून 97.8 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.

मृण्मयी योगेश चौधरी, वेदांत संजय बाविस्कर, दुर्मिल संजय पाटील या तीन विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहे. गणित विषयात मृण्मयी चौधरी, दुर्मिल पाटील या दोन विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले. विज्ञान विषयात वेदांत संजय बाविस्कर या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 गुण मिळाले. इंग्रजी विषयात ओम रजनीश कारंजे या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले.

अर्चित राहुल पाटील 97.8 टक्के गुण मिळवून प्रथम तर द्वितीय मृण्मयी योगेश चौधरी 97.6 टक्के, तृतीय वेदांत संजय बाविस्कर 97.6 टक्के, चतुर्थ दुर्मिल संजय पाटील 97.2 टक्के, पाचवा ओम रजनीश कारंजे 96. 4 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. शाळेची ही बारावी बॅच असून आतापर्यंत 100% निकालाची परंपरा कायम आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष धनंजय जकातदार,प्राचार्य गणेश पाटील, उपप्राचार्य सर्व व्यवस्थापन मंडळ व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी कौतुक केले.

ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल

के.सी.ई.सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

शाळेत इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्रावणी राजेश हरेल या विद्यार्थ्यानीने 98.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर चिन्मय ललित तावडे 97 टक्के गुण मिळवत द्वितीय स्थान मिळविले.

कोमल एकनाथ पाचपांडे या विद्यार्थिनीने 96.60 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाला आहे. एकूण 16 विद्यार्थ्यांनी शेकडा 90 टक्केच्यावर गुण संपादित केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर यांनी कौतुक केले आहे.

तसेच स्कूलच्या प्राचार्य सुषमा कंची व उपप्राचार्य माधवीलता सिट्रा यांनीदेखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. शाळेची नियोजन बद्ध शिक्षण प्रणाली, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन व विद्यार्थीची मेहनत या सर्वांच्या समन्वयातूनच आज हे यश प्राप्त होऊ शकले आहे .असे मनोगत याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी व्यक्त केले.

पोदार इंटरनॅशनल स्कूल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 24 विद्यार्थी 90 टक्क्यांहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झाले.

पुर्विका दीपक धांडे 98 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम तर वेदिका धीरज अग्रवाल 97.80 टक्के गुण मिळवून द्वितीय तर स्तुती निर्णय चौधरी ही 96 टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

चतुर्थ प्रथमेश गिरीश बाजपेयी 95.80टक्के तर कौशल दर्शन डेमला ही 95.60टक्के मिळवून पाचव्यास्थानी आली आहे. सहाव्या क्रमांकावर राजवी सर्वेश कुलकर्णी 95.20टक्के, साक्षी सचिन पाटील 94.80 टक्के, गार्गी मिलिंद जोशी 94.80टक्के गुण मिळवून सातव्या क्रमांकावर आली आहे.कणव अमित भुतडा हा 94.60 टक्के व मिलिंद सदाशिव पाटील 94.60 टक्के गुण मिळवून आठव्या क्रमांकावर आहेत.

स्नेहल शैलेश झवर 94.20 टक्के या विद्यार्थ्यांनी शाळेतून नववा क्रमांक पटकावला. आरती अमित चौधरी हीने शाळेतील सर्वोत्कृष्ट दहा विद्यार्थ्यांमध्ये 94 टक्के गुण मिळवून स्थान पटकावले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या