Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशCDS Bipin Rawat: CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आले समोर;...

CDS Bipin Rawat: CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आले समोर; ‘त्या’ एका चुकीमुळे झाला १२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या अपघातात रावत यांच्या पत्नीसह लष्करी अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. त्यांचे हेलिकॉप्टर तमिळनाडू येथील कुन्नूर परिसरात कोसळले होते. यात बिपीन रावत यांच्या पत्नीसह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या समितीने महत्त्वाचा अहवाल सादर केला असून, या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सदर समितीच्या अहवालामध्ये ८ डिसेंबर २०२१ मध्ये एमआय १७ वी५ हेलिकॉप्टर अपघातामागील नेमके कारण समोर आणले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीने जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबतचा अहवाल संसदेत सादर केला आहे. लष्करी हेलिकॉप्टरचे नाव एमआय १७ असे देण्यात आले असून तारीख रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची आहे. मानवी त्रुटीमुळे अर्थात एअर क्रू मेंबरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारतीय वायूदलाने पुरवलेल्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि लष्करातील इतर काही अधिकारी यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. तो अपघात इतका भीषण होता की यामध्ये सर्वांचाच मृत्यू झाला. तामिनळाडूतील कुन्नूर इथे हा भीषण अपघात झाला होता.

मंगळवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये संरक्षण संबंधी स्थायी समितीनं १३ व्या रक्षा योजना अवधीदरम्यान झालेल्या वायुदलाच्या विमानांच्या अपघातांची आकडेवारी सादर करण्यात आली. यामध्ये एकूण ३४ दुर्घटना समोर आल्या ज्यामध्ये २०२१-२२ मध्ये भारतीय वायुदलाची एकूण ९ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली. २०१८-१९ मध्ये अशा ११ अपघातांची नोंद करण्यात आली होती.

भारतीय वायुसेनेचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावरून वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे जाण्यात निघाले होते. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर १२ सशस्त्र दलाचे कर्मचारी या विमानात होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले. या अपघातानंतर शौर्य चक्र पुरस्कार विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले होते. परंतू त्यांचा अपघाताच्या आठवडाभरानंतर मृत्यू झाला होता.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण देशाला या हादरा बसला असून, २०२१ या वर्षअखेरीस सारा देश हळहळला होता. अपघातानंतर घटनास्थळाची दृश्य समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. पण, हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की मृतांचे मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढतानाही कैक अडचणी आल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...