Sunday, October 13, 2024
Homeनगरनेवासामध्ये श्रीराम मंदिरात आनंदोत्सव साजरा

नेवासामध्ये श्रीराम मंदिरात आनंदोत्सव साजरा

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी खास आहे. कारण सर्व हिंदू धर्माची आस्था श्रीरामप्रभू यांचे आयोध्या नगरीत पंतप्रधान यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडत असताना शहरातील श्रीराम मंदिरामध्ये पुजा अर्चना करण्यात येवुन राजेंद्र गुजराथी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी रविंद्र मुनोत यांनी अकरा किलो लाडुचा दिलेला प्रसाद पुजारी अंकुश लवडकर यांनी भाविकांना वाटला.

- Advertisement -

नेवासा पंचक्रोशीमध्ये मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. घरोघरी सडा रांगोळी काढुन घरावर ध्वजारोहण करुन आंब्याच्या पानाचे तोरण लावण्यात येवुन रामरक्षा , हनुमान स्तोत्र, पठण करण्यात आले श्रीराम समर्थचा नाम जप करण्यात आला. आरती करण्यात येवुन प्रसाद वाटप करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली

रामनामाची धून गात आज घरोघरी प्रभू श्रीरामांना अभिवादन केले गेले. संपूर्ण अयोध्यानगरी भूमिपूजनाच्या शुभ मुहूर्तामध्ये सामील होण्यास या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नाहीये, परंतु घराच्या अंगणात रांगोळी आणि छतावर भगवा ध्वज लावून नागरिक या सोहळ्यात सहभाग नोंदवित आहेत. सायंकाळी श्रीराम मंदीर, श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

बेलपिंपळगाव येथे श्रीराम मंदिरात आनंदोत्सव साजरा

बेलपिंपळगाव | वार्ताहर | Belpimpalgaon

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील श्री राम मंदिरात आज मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या शेकडो वर्षापासून प्रलंबित असलेले अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला याचा आनंद प्रत्येक गावागावात साजरा झाला.

करोनाच्या भीतीने गावात सोशल डिस्टन्स पाळत गावातील राम मंदिर मध्ये आनंदोत्सव साजरा केला यावेळी सकाळ पासून भजन चे आयोजन करण्यात आले होते, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली अनेकांच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद होता. गावात श्री राम मंदिर समोर जमलेल्या राम भक्तांनी जयजयकार करत आनंद घेतला तर देवस्थानच्या व गावकऱ्यांनी गावात मिठाई वाटप केले. तसेच गावातील श्री विठ्ठल मंदिर येथे देखील हा आनंद साजरा करण्यात आला. गावातील आकांक्षा रमेश सरोदे या मुलीने गावात आकर्षक प्रभूराम यांची रांगोळी काढली होती. ही गावकऱ्यांची आकर्षण राहिली.

चांद्यात सियारामचा जयजयकार करत आनंदोत्सव साजरा

चांदा | वार्ताहर | Chanda

भारतभुमीचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम मंदिराचा भुमीपुजन समारंभ अयोध्येत आज संपन्न होत असताना त्याचा आनंदोत्सव नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. 

आज सकाळी गावातील संत मंडळी, भजनी मंडळ सर्वपक्षीय राजकिय पदाधिकारी गावातील युवक शनी मंदिरासमोर एकत्र आले. सर्वात प्रथम तोंडाला मास्क तसेच सोशल डिस्टनसिंगच भान ठेवत एकत्र आले. सुमारे पाचशे वर्ष ज्या सुवर्णक्षणाची श्रीरामसेवक वाट पाहत होते, तो क्षण आज उगवला होता. या सर्वांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करण्यात करून पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. सियारामा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर श्रीराम आरती झाली बाजारतळावरील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मुख्य पेठेतील प्रभु श्रीराम मंदीरात त्यानंतर पुजाअर्चा संपन्न झाली यावेळी संत मंडळी, सर्वपक्षिय पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आदि श्रीरामसेवक सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या