Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याPankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९...

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई | Mumbai

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने (Central GST Commissionerate) मोठी कारवाई केली आहे. जीएसटी आयुक्तालयाने एप्रिल महिन्यात कारखान्यावर छापेमारीची (Raid) कारवाई केली होती. यानंतर केंद्र सरकारचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. त्यानंतर आता केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

Chandrashekhar Bawankule : “आपल्या विरोधात बातम्या येऊ म्हणून पत्रकारांना…”; बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला (Vaidyanath Cooperative Sugar Factory) केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटीसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापेमारी करतानाच काही कागदपत्रे हस्तगत केली होती. या कागदपत्रांमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर (GST Tax) बुडवल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तालयाने (GST Commissionerate) या कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत. तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यापूर्वीच युनियन बँकेने सील केला असून लिलावाची प्रक्रिया देखील सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

Video : “आम्हाला नाही, तर तुम्हाला नाही”; थकीत वेतनासाठी निसाका कामगारांचे गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन

दरम्यान, जीएसटी आयुक्तालयाने कारखान्यातील कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेले एक पत्रक जीएसटी विभागाकडून कारखान्याच्या गेटवर लावण्यात आले आहे. त्या लावलेल्या पत्रकानुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या या मशिनरीचा लिलाव करुन कर वसूल करणार असल्याचे देखील जीएसटी विभागाने (GST Department) म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिलं सुवर्ण, रोईंगमध्ये दोन कांस्यपदक

- Advertisment -

ताज्या बातम्या