Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यानितीन गडकरींनी बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा ; म्हणाले, ती इच्छा..

नितीन गडकरींनी बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा ; म्हणाले, ती इच्छा..

मुंबई | Mumbai

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता राजकारण्यांवर सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अजित पवारांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर सामान्य नागरिकांनी विविध माध्यमातून राजकारण्यांवर संताप व्यक्त करायला सुरवात केली आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) एक इच्छा अपूर्ण राहिल्याचा खुलासा केला आहे.

- Advertisement -

अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र यावे, अशी चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी (Raj Thackeray and Uddhav Thackeray) एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर्सही झळकले आहे. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा एक किस्सा सांगितला आहे. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलेले आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी थेट शेतकऱ्याच्या बांधावर; शेतात जाऊन केली भाताची लावणी, ट्रॅक्टरही चालवला

“बाळासाहेबांचे माझ्यावर आणि माझे बाळासाहेबांवर खूप प्रेम होते. बाळासाहेब त्यांच्या अखेरच्या दिवसांत होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होतो. त्यावेळेस त्यांनी सर्वांना बाहेर जायलं सांगितले आणि मला एकट्यात शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी मला राज आणि उद्दव यांना एकत्र करण्यास सांगितले. राजकारण एका बाजुला, पण एक कुटुंब म्हणून एकत्र असल्यावर ताकत वाढत असते. बाळासाहेबांची ती इच्छा अद्याप अपूर्ण राहिली आहे,” असे म्हणत त्यांनी या दोघांच्याही एकत्र येण्याबाबतच्या किस्स्याची माहिती दिली आहे.

…अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो; नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊत हे काय बोलून गेले..

राजकारणापासून मैत्री व नाती दूर ठेवायला हवीत, असेही गडकरींनी सांगितले. “राजकारणात काहीही होऊद्या, पण एक कुटुंब म्हणून आपण एकत्र असलो की आपली ताकद कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहून काम करावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. मला माहीत नाही की काळाच्या ओघात काय होईल, कारण राजकारणातून बरेच पाणी वाहून गेलेय. राजकारण वेगळं मैत्री वेगळी, राजकारण वेगळे संबंध वेगळे, यात अंतर ठेवूनच आपण वागायला हवे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणे हे योग्य नाही आणि ते करूही नये,” असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या