Friday, November 27, 2026
Homeदेश विदेशमोठी बातमी! डिलिमीटेशन विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार?

मोठी बातमी! डिलिमीटेशन विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी; लोकसभेच्या किती जागा वाढणार?

नवी दिल्ली | New Delhi
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशनवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्यांमधील लोकसभेच्या जागांचे विद्यमान प्रमाण कायम ठेवत प्रत्येक राज्यातील जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच राज्यांमधील लोकसभेच्या जागांचे प्रमाण आणखी २५ वर्षे गोठवण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकांमध्ये आवश्यक दुरुस्त्यांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

आज दुपारी २ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाची अधिवशेनासंदर्भात महत्वाची बैठक झाली. तब्बल पाऊण तास ही बैठक झाली. या बैठकीमध्ये डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकासंदर्भात मोठा निर्णय घेतला जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरला. केंद्रीय मंत्रिमंडळाने डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी दिली. याव्यतिरिक्त, महिला आरक्षणाशी संबंधित एक दुरुस्तीही मंजूर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेमध्ये ५० टक्के जागा वाढणार आहेत. लोकसभेतील जागा ५४३ वरून ८१५ होणार आहेत. या विधेयकाच्या मंजुरीमुळे महिला आरक्षण कायद्यात सुधारणा होईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित एका दुरूस्तीलाही मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर आणि राज्यसभेचे अधिवशेन २ डिसेंबर रोजी होणार आहे.

VIDEO | Delhi: The Union Cabinet met here on Friday and is learnt to have cleared a fresh delimitation-linked women’s reservation bill, which is likely to be brought before the special sitting of Parliament beginning next week.

Sources said the bill was brought before the special meeting of the Union Cabinet, which is expected to accord its nod to the fresh bill with some amendments to ensure that no state loses its representation in the Lok Sabha in proportion to other states after delimitation.

The Cabinet meeting was chaired by Prime Minister Narendra Modi and was convened at 1 pm at Sewa Teerth to discuss the bill, which the government is keen to get passed in the special sitting of Parliament starting Monday.

Source: PMO— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2026

केंद्रीय मंत्रिमंडळाने परिसीमन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकातील प्रस्तावित बदलांना मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आगामी काळात लोकसभेच्या सध्याच्या जागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तसेच, या प्रस्तावित बदलांनुसार, नवीन जागांचे वाटप पुढील २५ वर्षांसाठी म्हणजेच २०५१ पर्यंत गोठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेत ५० टक्के जागा वाढल्यास नव्या संसदेत लोकसभेच्या ५४३ जागांमध्ये वाढ होऊन ८१५ जागा होणार आहेत.

दिल्ली पातळीवर आणि राज्य सरकारच्या पातळीवरती घडामोडींना वेग आला आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क केला असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाशी आता भाजपचे वरिष्ठ नेते संपर्क साधत आहेत. याआधी देखील संपर्क करण्यात आला होता, हे विधेयक पास व्हावं यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर हे विधेयक पास करताना कोणकोणते पक्ष पाठिंबा देऊ शकतात त्यांना संपर्क केला जात आहे, तर या विधेयकाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्याला पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

डिलिमीटेशन

डिलिमीटेशन विधेयकाला DMKचा पाठिंबा मिळण्याची शक्यता पण दोन अटींवर, स्टॅलिन म्हणाले,...

0
नवी दिल्ली | New Delhiमतदारसंघ पुनर्रचनेच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत भारतात सर्वप्रथम आवाज उठवणारा पक्ष डीएमके हाच होता. सत्तेसाठी आपल्या तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या निर्लज्ज आणि कृतघ्न...