Friday, May 3, 2024
Homeनाशिकसीईटी सेल’ची दिलगिरी; कृषी प्रवेश वाटप यादी महाआयटीने केली सादर

सीईटी सेल’ची दिलगिरी; कृषी प्रवेश वाटप यादी महाआयटीने केली सादर

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील नियोजित दुसरी प्रवेश वाटप यादी ‘महाआयटी’ने सादर न केल्याने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षावर (सीईटी सेल) दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. महाआयटीकडून प्रवेश वाटप यादी प्राप्त होताच ती जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.

- Advertisement -

सीईटी सेलकडून कृषि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेचे काम ‘महाआयटी’कडे आहे. या पूर्वी या प्रवेश प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप होत असल्याबाबत कार्यपद्धतीसंदर्भात स्पष्ट सूचना सीईटी सेलकडून देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

गुणवत्ता यादी जाहीर न केल्याबाबत सीईटी सेलने दिलगिरी व्यक्त करणारे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १४ फेब्रुवारीला दुसरी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार होती.

मात्र महाआयटीकडून ही यादी अद्यापही सादर करण्यात आलेली नसल्याने दुसरी प्रवेश वाटप यादी जाहीर करता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष दिलगिरी व्यक्त करत आहे.

महाआयटीकडून दुसरी प्रवेश वाटप यादी प्राप्त होताच सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सदर यादी जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच सुधारित रिपोर्टिगचा कालावधी निश्चित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या