Sunday, March 30, 2025
Homeक्राईमCrime News : शिर्डीत चैन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद

Crime News : शिर्डीत चैन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी (Shirdi) परीसरात चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करण्यार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) जेरबंद केले असून त्यांच्याकडून 11 लाख 84 हजार 320 रूपये किमतीचे 156.87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने (Gold Jewelry) व 80 हजार रू किंमतीची मोटारसायकल असा एकुण 11 लाख 84 हजार 320 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चार आरोपींना जेरबंद (Arrested) केले आहे.

- Advertisement -

दि.20 मार्च 2025 रोजी फिर्यादी कुमारीदुर्गा रामप्रभु (रा.कपीलेश्वर नगर, निलंग्रे), चेन्नई (Chennai)-तामीळनाडू (Tamilnadu) या शिर्डी येथे रस्त्याने पायी जात असताना यातील अज्ञात आरोपी हे मोटारसायकलवर येऊन त्यांनी फिर्यादीचे गळयातील सोन्याची चैन ओढून चैन स्नॅचिंग करून घेऊन गेले. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिर्डी पोलीस स्टेशन (Shirdi Police Station) हद्दीत चैन स्नॅचिंगच्या गुन्हयांचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास वर नमूद चैन स्नॅचिंगचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ मधुकर चौभे व त्याचे साथीदारांनी केलेला असून ते शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

या माहितीवरून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिर्डी परिसरात आरोपीचा शोध घेऊन सोमनाथ मधुकर चौभे (रा.अशोकनगर ता.श्रीरामपूर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (रा.लाडगाव चौफुली, ता.वैजापूर जि.छ.संभाजीनगर), अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण (रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर) व संतोष म्हसु मगर (रा.बेलापूर रोड, गायकर वस्ती ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. आरोपीना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी सोमनाथ मधुकर चौभे याने काही दिवसापुर्वी अक्षय हिराचंद त्रिभुवन याचेसह मोटारसायकलवर शिर्डी (Shirdi) येथे एका महिलेच्या गळयातील सोन्याची चैन ओढुन चोरी केली असून त्यावेळी चिंग्या गोडाजी चव्हाण व संतोष म्हसु मगर हे मोटारसायकलवर गुन्हा करण्यास मदत करत असल्याची माहिती सांगीतली.

पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही महिन्यापासुन शिर्डी, संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे वेगवेगळया ठिकाणी महिलांचे गळयातील सोन्याचे दागीने चोरी केल्याचे सांगीतलेल्या माहितीवरून शिर्डी, तोफखाना, संगमनेर शहर (Sangamner) व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अभिलेख पडताळणी करून खालीलप्रमाणे 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ताब्यातील आरोपीकडे त्यांनी केलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण याने चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने हे सोनार महेश अरूणराव उदावंत (रा.गंगापूर ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर) यास विकले असल्याची माहिती सांगीतली. पथकाने पंचासमक्ष सोनार महेश अरूणराव उदावंत यांनी घेतलेल्या सोन्याची चैन वितळवून केलेली 5 लाख 53 हजार 840 रूपये किंमतीचे 69.230 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

आरोपी सोमनाथ मधुकर चौभे याने गुन्हयातील चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागीने सोनार गुणवंत चंद्रकांत दाभाडे, रा.कोळपेवाडी, ता.कोपरगाव व काही दागीने सोनार विजय अशोक दाभाडे, रा.महालगाव, ता.वैजापूर यास विकले असल्याची माहिती सांगून गुन्हयातील काही चोरी केलेले सोन्याचे दागीने हे त्याचे सासरी कोळपेवाडी ता. कोपरगाव येथे ठेवल्याची माहिती सांगीतली. पथकाने पंचासमक्ष सोनार विजय अशोक दाभाडे याने हजर केलेले व तसेच सोमनाथ मधुकर चौभे याने घरी ठेवलेले असे एकुण 5 लाख 50 हजार 480 रूपये किंमतीचे 87.64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 80 हजार रूपये किंमतीची गुन्हयांत वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

आरोपी सोमनाथ मधुकर चौभे हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन (Kopargav Taluka Police Station) गुरनं 94/2024 भादंवि कलम 302, 376 या गुन्हयात हा फरार आहे. पथकाने तपासकामी वर नमूद आरोपीकडून 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण 11 लाख 4 हजार 320/- रूपये किंमतीचे 156.87 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व 80 हजार रू किंमतीची मोटार सायकल असा एकुण 11 लाख 84 हजार 320 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यातील आरोपीतांना शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 312/2025 या गुन्हयाचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आज चंद्रदर्शन झाल्याने उद्या रमजान ईदचा सण साजरा होणार

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik पवित्र रमजान महिन्यांचे आज 29 रोजे पूर्ण झाले तर रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान चंद्रदर्शनाची ग्वाही केंद्रीय कमिटीला मिळाल्यानंतर उद्या सोमवारी...