Friday, May 3, 2024
Homeनगरओबीसी आरक्षणप्रश्‍नी चक्काजामचा निर्णय

ओबीसी आरक्षणप्रश्‍नी चक्काजामचा निर्णय

कर्जत (प्रतिनिधी) – ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी शनिवारी (दि. 26) वनविभागाच्या ऑफिस शेजारी कर्जत-नगर रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या तालुका पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कांचनताई खेत्रे होत्या. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, सुनील काका यादव, रेणुकर ताई, भारत मासाळ, ज्ञानदेव लष्कर, डॉ विलास राऊत आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या