चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon
नगरपरिषदेच्या निवडणुकीची (Nagar Parishad Election) धामधुम सुरु असतांना अचानकपणे नंदन डेअरी ते आंबडेकर नगरापर्यंतच्या भाजीमंडई नदीच्या पुलावरील रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. तर त्याच रोडवरील स्वच्छतागृह देखील पाडण्यात आले.
याप्रकरणी शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासनास धारेवर धरल्यानतंर काल (बुधारी) रात्री रस्ता तयार करणारा व स्वच्छतागृह पाडणारा अज्ञात ठेकेदाराविरोधात नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून तक्रार (Complaint) दाखल करण्यात आली. यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनला भादवी कलम १८८ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, पुढील तपास पोलीस (Police) करीत असून ठेकेदाराचा कसून शोध घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आचारसंहितेत रस्ता झालाच कसा? म्हणून हे प्रकरण न.पा.च्या निवडणुकीत चांगलेच गाजत असून, थेट याचा प्रभाव मतदानावर पडणार असल्याच्या चर्चा शहरात आहे.




