Friday, May 3, 2024
HomeUncategorizedगुन्ह्यांनी गाजले वर्ष

गुन्ह्यांनी गाजले वर्ष

राम निकुंभ

धुळे – Dhule

- Advertisement -

धुळे जिल्हा तसा कोणत्या ना कोणत्या घटनेने नेहमीच चर्चेत असतो. सन 2020 घात-अपघात, खून, दरोडा आणि गांजा कारवाईमुळे चर्चेत राहीला. वर्षभरात तब्बल 28 खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्यात 25 गुन्ह्याचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले असून निमगुळ येथील बालिकेच्या निर्घुण हत्याचा मात्र अद्यापही तपास लागलेला नाही. त्यामुळे येणार्‍या नवीन वर्षात पोलिसांना अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासासह वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान राहणार आहे.

मोहन मराठे प्रकरण राज्यभर गाजले : दोंडाईचात चोरीच्या संशयावरुन ताब्यात घेतलेल्या मोहन मराठे यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरण राज्यभर गाजले. यात पोलिसांचीच जगलरी उघड झाल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षकासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल होवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सीआयडी पुढील तपास करीत आहेत.

युवा नेतृत्व गमावले जिल्ह्यात वर्षभरात विविध 137 अपघातांच्या घटनांमध्ये तब्बल 32 जणांना आपला जिव गमवाला लागला. तर 192 जण जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटनेमुळेच जिल्ह्याचे युवा नेतृत्व तपनभाई पटेल यांना गमावले. त्यांच्या अपघाती मृत्यू यावर्षीच्या सर्वाच्या लक्षात राहिल.

पोलिस अधिकार्‍यांकडे घरफोडी- मोटार सायकल चोरी आणि घरफोडीच्या घटनांनीही हे वर्ष चर्चेत राहिले. जिल्ह्यात 129 घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यातही पोलिस कर्मचारी अधिकार्‍यांकडील घरफोडी चर्चेत राहिली. आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी हातसफाई केली.

मात्र त्याचाही तपास लागलेला नाही. बालिकेची कुटूंबियांना न्यायाची प्रतिक्षाच- जिल्ह्यात वर्षभरात सुमारे 30 खुनाच्या घटना घडल्या. त्यात 26 प्रकरणाचा तपास लावण्यास पोलिसांना यश आले. मात्र निमगुळ येथील बालिका खून प्रकरण, गरताडबारीतील अनोळखी महिला व दोन दिवसापुर्वीच सुलवाडे बॅरेजमध्ये गोणपाटात बांधलेल्यास्थितीत आढळेल्या अनोळखी महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. त्यात धुळे तालुक्यातील निमगुळ येथील बालिकेच्या निर्घुण खुनाची घटना सर्वाच्याच लक्षात राहिली. पंरतू या बालिकेच्या आरोपींपर्यंत पोलिस अद्यापही पोहोचु शकलेले नाही. त्यामुळे बालिकेच्या कुटुंबियांना न्यायाची प्रतिक्षा लागून आहे.

जबरी चोरी, दरोड्याचेही गुन्हे – जिल्ह्यात वर्षभरात 52 जबरी चोरी आणि 18 दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील अनेक गुन्ह्याची उकल झाली आहे. घातक शस्त्र मोहिमेचे स्वागत- पोलिसांनी यंदाही जिल्ह्याभरात घात शस्त्र जप्तीची मोहिम राबविली. त्यात तलवार, चाकु अशा हत्यारांसह 16 गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस असा लाखोंचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

वर्षअखेर गांजाशेतीवर नांगर

– तसे तर पोलिसांची वर्षभर गांजावर कारवाई सुरू होती. पंरतू आ.अनिल गोटे यांनी जिल्ह्यातील गांजा शेतीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पोलिस, महसूल व वनविभागाने वर्षअखेर अनेक गांजा शेतीवर नांगर फिरविला. त्यात शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला. एकुण 3 कोटी 20 लाख 98 हजारांचा मुद्येमाल जप्त करत 54 आरोपींनाही अटक करण्यात आली.

सायबर क्राईमचे 22 गुन्हे – जिल्ह्यात सायबर क्राईमध्येही वाढ होत आहे. बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत ऑनलाईन गंडा घालण्यासह विविध प्रकारचे 22 गुन्हे दाखल झाले आहेत.

13 लाचखोर रंगेहाथ- लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही वर्षभरात 13 लाचखोरांवर कारवाई केली. त्यात विविध विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

मो.नं.92715 04737

- Advertisment -

ताज्या बातम्या