Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबार2 मे पर्यंत जिल्हयात गारपीटीची शक्यता

2 मे पर्यंत जिल्हयात गारपीटीची शक्यता

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

भारतीय हवामान विभागाकडून दि.28 एप्रिल 2021 रोजीच्या प्राप्त संदेशानुसार दि.28 एप्रिल 2 मे 2021 पर्यंत नंदुरबार जिल्हयात वादळीवारा, वीज व गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दि. 28 एप्रिल ते 2 मेपर्यंत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळीवारे वाहणार असून वीज व गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानुसार शेतकर्‍यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. शेतमाल व काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकुन ठेवावीत.

वादळी वार्‍यापासून संरक्षणासाठी भाजीपाला, मिरची, पपई, केळी, आदी पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.

पथारीवर वाळत ठेवलेली मिरची सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही अशी काळजी घ्यावी.

वीजेपासून व गारांपासून बचावा साठी सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मजवळ थांबू नये.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीजा आणि गारपीटीपासुन स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या