Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई l Mumbai

राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. १६ फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाडा तर दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण विभागात १७ आणि १८ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी म्हणून राज्यातील १५ जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता उत्तर भारतातून वाहणारे थंड वार्‍याचे प्रवाह थांबले आहेत. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात उष्ण वारे वाहत आहेत परिणामी आता राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानामध्ये वाढ झाली आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

राज्यातील हिंगोली, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, अकोला, अमरावती. बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची आहे. यादरम्यान मेघगर्जनांची शक्यताही आहे. हवामान विभागानं, 16 फेब्रुवारीला हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवत यलो अलर्ट जारी केला आहे. सोबतच १७ आणि १८ फेब्रुवारीला परभणी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याततही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात १८ फेब्रुवारीला यलो अलर्ट जारी केला आहे. शेतकर्‍यांनी या पावसाच्या अंदाजानुसार त्यांच्या कामांचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या