मुक्ताईनगर । प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात 175 गावे असून मतदार संघातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी व संवाद साधण्यासाठी महायुतीचे महायुतीचे उमेदवार आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस एक करीत आहेत असे असतानाच महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा परिवार सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरला असून ‘भाऊ तुम्ही आमदार, लय दमदार’च्या उद्घोषात प्रचाराचा जल्लोष मतदार संघात पाहावयास मिळत आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कालावधीत अनेक विकास कामे केली व उर्वरित काही कामे बाकी आहेत परंतु जनतेने पुन्हा सेवेची संधी दिल्यास उर्वरित राहिलेला विकास मार्गी लावण्यासाठी पुन्हा जनतेच्या दरबारात जात आहेत. या माध्यमातून मतदार संघाचा व सर्वांचा विकास हाच ध्यास चंद्रकांत पाटील यांचा असल्याचे ते आपल्या प्रचार सभांमधून मांडत आहेत त्यांनी आज दि.12 नोव्हेंबर 2024 रोजी बोदवड तालुक्यातील जलचक्र बुद्रुक, जलचक्र खुर्द, वराड खुर्द, वराड बुद्रुक, मुक्तळ, सुरवाडा बुद्रुक, सुरवाडा खुर्द, मानमोडी, शेवगा खुर्द, कुर्हा हरदो व मनूर बुद्रुक या गावांमध्ये प्रचार रॅली काढली.
मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड, धामणगाव, बोरखेडा नवे, मोरझिरा या गावांमध्ये आ.चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनिताई चंद्रकांत पाटील, कन्या संजना पाटील, प्रियंका पाटील व महिला आघाडी तसेच शिवसेना पदाधिकारी असा परिवारही प्रचाराच्या रिंगणात उतरल्याने ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात येते आहे.