Friday, November 15, 2024
Homeराजकीयकरोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही -चंद्रकांत पाटील

करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही -चंद्रकांत पाटील

पुणे |प्रतिनिधि| Pune

“करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisement -

राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आजवर तब्बल शंभरवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्रांची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत

पाटील म्हणाले की, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक मेडिकलमध्ये जातात. मात्र त्या ठिकाणी जादा दर आकारले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. त्यावर सरकारचे लक्ष नाही.

यामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने विशेष पथके नेमून काळा बाजार करणार्‍यावर धाडी घातल्या पाहिजे. मात्र हे होताना दिसत नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या