Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आज अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. कारण आज दिल्लीतून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदावर कोण असणार या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं. त्याजागी आता बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर आशिष शेलार (Aashish Shelar) यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने आक्रमक चेहऱ्याला बळ दिले आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदावर नियुक्ती झाल्याने शेलारांना अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या