Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यात्यांच्या मुलाबाळांचे भविष्य धोक्यात आलंय म्हणून...; विरोधकांच्या बैठकीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य धोक्यात आलंय म्हणून…; विरोधकांच्या बैठकीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई | Mumbai

पाटण्यात विरोधी पक्षांची आज बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार हजर असतील. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. एकीकडे आपले पंतप्रधान भारताला उंची देण्यासाठी काम करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक पाटण्यात एकत्र येत आहेत. कशासाठी? तर देशासाठी नाही, त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला.

- Advertisement -

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला उंची देण्याकरता काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटणाला एकत्र येतात आहे. आणि एकत्र येऊन काय करतात आहे त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरू आहे. सोनिया गांधींना राहुल गांधींना पंतप्रधान करायचा आहे. तर शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना पुढे करायचा आहे. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना पुढे करायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी एक मूठ बांधले आहे, असा निशाणा बावनकुळेंनी महाविकास आघाडीवर साधला आहे. जनता ओळखून आहे. २०१४ ला हेच झाला आणि २०१९ झालं पण हेच केलं पण काही झालं नाही. आता कितीही वज्रमूठ बांधल्या कोणतेही मूठ बांधली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वोत्तम नेते, जगातील प्रथम पंतप्रधान आणि जगातील सगळ्यात उत्तम व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत. २०२४ मध्ये संपूर्ण एनडीए फोर हंड्रेड प्लस झाल्याशिवाय राहणार नाही. भारत देशातील एक एक नागरिक पंतप्रधान मोदी यांना मतदान करेल, असे त्यांनी म्हंटले आहे

टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणं ठरलं जीवघेणं, ‘त्या’ अब्जाधीशांसह पाच ही जणांचा मृत्यू… समुद्रात नेमकं काय घडलं?

विरोधक एकत्र येतात कशासाठी एकत्र येतात. त्यांची पुढच्या भविष्यातली पिढी धोक्यात आलेली आहे. त्यांना असं वाटतं की आज आम्ही एकत्र नाही तर पुढील कुळ उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही केलेले गैरव्यवहार आम्ही केलेले काळे धंदे केले आहे ते उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकीकडे आपल्या पुढच्या पिढ्यांची संरक्षण करण्यासाठी ते एकत्र येत आहेत. त्यांना देश हित नाही आहे. यांना समाजाच्या शेवटच्या लोकांच्या समाज हाताशी देणंघेणं नाही. इथे पैशापासून सत्ता सत्तेपासून पैसा आहे यांचा समीकरण आहे. आपल्या मुलांना मोठा करण्यासाठी म्हणून या ठिकाणी या मूठ बांधण्यात येत आहे. पण ही मूठ सैल करण्याचं काम १४० कोटी जनता करणार आहे, अशी टीका त्यांनी विरोधी पक्षांवर केली आहे. तसेच ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही, ते दिल्ली काय सांभाळणार? महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. कोविड घोटाळ्यासह येवढे काळे धंदे करून ठेवले आहे की, आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणारं नाही. अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

डाॅक्टरने संपवले अख्खे कुटूंब, तिघांची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या