Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशChandrayaan-3 : चांद्रयान-३ बाबत समोर आली महत्वाची अपडेट, आता पुढचा टप्पा महत्वाचा

Chandrayaan-3 : चांद्रयान-३ बाबत समोर आली महत्वाची अपडेट, आता पुढचा टप्पा महत्वाचा

मुंबई | Mumbai

चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा अखेर पार पडला आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहरे पडून चांद्रयान 3 चा आता थेट चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. चांद्रयान 3 आतापर्यंत पृथ्वीच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत होते. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. आज या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आले.

- Advertisement -

१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १२.०० ते १.०० दरम्यान ट्रान्सलुनर इंजेक्शन (TLI) पार पडणार आहे. ट्रान्सलुनर इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर चांद्रयान-3 चंद्राला दीर्घ वर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालत पुढे जाईल. चांद्रयान-3 अंतराळयानाने १२७६०९ किमी x २३६ किमीची कक्षा गाठणे अपेक्षित आहे. निरीक्षणानंतर हा आकडा नेका किती आहे ते स्पष्ट होईल. ३१ जुलैपर्यंत चांद्रयान-३ एक लाख किलोमीटरच्या कक्षेत नेण्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे लक्ष्य आहे.

RSS चे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी अनंतात विलीन

यानंतर एक ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान-3 ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. एक ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेदरम्यान ही क्रिया पार पडेल.

इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडियाच्या नावातही ‘INDIA’; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

चंद्रावर कधी पोहोचणार

१४ जुलै रोजी चांद्रयान-३ चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयानाच्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. ५ ते ६ ऑगस्टदरम्यान चांद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल.

यासाठी पृथ्वीच्या कक्षेतून ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाहेर पाठवण्यात आलं, त्याच्या अगदी उलट पद्धतीने चंद्राच्या कक्षेत ते प्रवास करेल. हा टप्पा ISRO च्या शास्त्रज्ञांसाठी अत्यंत अव्हानात्मक टप्पा असणार आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या