Friday, May 3, 2024
Homeदेश विदेश१ ऑगस्टपासून या नियमात होणार बदल

१ ऑगस्टपासून या नियमात होणार बदल

मुंबई | Mumbai

जुलै महिना संपण्यासाठी अवघा एक दिवस राहीले आहे. पुढील आठवड्यात ऑगस्ट (Changes In Rules From August) महिना सुरू होणार आहे. १ ऑगस्टपासून पैशांशी संबंधित काही नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. १ ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊ यात.

- Advertisement -

एलपीजीच्या किमतीत बदल होऊ शकतो

एलपीजीच्या किमती (Change In LPG Rates) सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवते. सरकारी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडर तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल करू शकतात. या कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. याशिवाय पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे दरही बदलू शकतात.

आयटीआर दाखल केला नाही तर दंड

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी रिटर्न भरण्याची (IT Returns) अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. तुम्ही या तारखेपर्यंत विवरणपत्र भरावे. आतापर्यंत ७ कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत. जर करदात्याने ३१ जुलै २०२३ नंतर रिटर्न फाइल केले तर त्याला दंड भरावा लागू शकतो. आयटीआर उशीरा भरल्यास १,००० रुपये किंवा ५,००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हीला आयटीआर भरण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत आहे.

Russia-Ukrain War : युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला ; रशियाने हवाई वाहतूक केली बंद

१४ दिवस बँका बंद राहणार

इतर महिन्यांप्रमाणेच आरबीआयने ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे (Bank Holidays). ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. याबरोबरच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासू शकता.

जीएसटीसाठी इलेक्ट्रॉनिक पावत्या द्याव्या लागणार

तसेच ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ ऑगस्टपासून इलेक्ट्रॉनिक पावत्या (Electronic Invoice) द्याव्या लागणार आहेत .

मुख्यमंत्री शिंदेंनी केली नाशिक-मुंबई महामार्गाची पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

वाहतूक नियमांमध्ये बदल

वाहतूक नियम सरकार वाहतुकीशी संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सशिवाय गाडी चालवणाऱ्यांना 5-5 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो, तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या