Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यांतर्गत अन्नधान्य-कडधान्य पीकस्पर्धा योजनेच्या निकषात बदल

राज्यांतर्गत अन्नधान्य-कडधान्य पीकस्पर्धा योजनेच्या निकषात बदल

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य सरकारच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना आणली असून अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा घेऊन शेतकऱ्यांना बक्षिसे देण्याच्या पीक स्पर्धेच्या निकषात शासनाने बदल केले असून यापुढे सदरची स्पर्धा 3 टप्प्यामध्ये आयोजित न करता एकाच वर्षात आयोजित केली जाणार आहे. यामध्ये शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

- Advertisement -

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकते बाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती , मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

सद्यस्थितीत सदरच्या योजनेमध्ये शेतक-याला राज्यस्तरावरील सर्वोच्च पारितोषिक मिळविण्यासाठी स्वतःचे शेतात 3 वर्ष सातत्याने तेच पिक घ्यावे लागते,उत्पादकतेत सातत्य राखावे लागते,दुर्देवाने अवकाळी आपत्कालीन / नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती उद्भवल्यास उत्पादकतेतील घट शेतक – यांना नाउमेद करते. एकुणतः या बाबी टाळण्यासाठी शेतक-यांना सहभागी होता यावे व एकाच वर्षात त्या पिकाच्या येणा-या उत्पादकतेवर स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने यापुर्वीच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यापुढे सदरची स्पर्धा 3 टप्प्यामध्ये आयोजित न करता एकाच वर्षात आयोजित केली जाणार आहे . यामध्ये शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य,विभाग,जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीसे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश आहे….

खरीप पिके – भात,ज्वारी,बाजरी, मका,नाचणी (राग), तूर, मूग, उडीद , सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल.

रब्बी पिके – ज्वारी , गहू , हरभरा , करडई , जवस , तीळ.

अर्ज दाखल करण्याची तारीख –

खरीप हंगाम – मूग व उडीद पिक (31जुलै), भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल (31ऑगस्ट),

रब्बी हंगाम – ज्वारी , गहू , हरभरा , करडई , जवस , तीळ (31 डिसेंबर).

पीक कापणी करण्यासाठी ग्राम पातळीवरील समिती –

1) पर्यवेक्षण अधिकारी -अध्यक्ष

2) सहभागी लाभार्थी शेतकरी-सदस्य

3) सरपंच-सदस्य

4) उपसरपंच -सदस्य

5) ग्रामपंचायत सदस्य -सदस्य

6) प्रगतशील शेतकरी – सदस्य

7) पोलीस पाटील -सदस्य

8) तलाठी – सदस्य

9) ग्रामसेवक – सदस्य

10) कृषी पर्यवेक्षक-सदस्य

11) कृषी सहायक/सेवक-सदस्य

पिकस्पर्धा निकाल घोषित करणेसाठी खालीलप्रमाणे समिती राहील

1) कृषी आयुक्त-अध्यक्ष

2) कृषि संचालक, विस्तार व नियोजन-सदस्य

3) कृषि सहसंचालक विस्तार व प्रशिक्षण-1 -सदस्य

4) कृषि सहसंचालक,विस्तार व प्रशिक्षण-2 — सदस्य

5) कृषि सहसंचालक,विस्तार व प्रशिक्षण 3 – सदस्य

6) मुख्य सांख्यिकी,कृषि आयुक्तालय-सदस्य

8) कृषि उपसंचालक,माहिती-सदस्य सचिव

जिल्हास्तर पिकस्पर्धा निकाल

राज्य आणि विभागस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते वगळून, संबंधित जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

तालुकास्तर पिकस्पर्धा निकाल

राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते वगळून, संबंधित तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

पीकस्पर्धा विजेता बक्षिस स्वरुप (सर्वसाधारण व आदिवासी गट)

अ.क्र – स्पर्धा पातळी – पहिले बक्षीस रुपये – दुसरे बक्षीस रुपये – तिसरे बक्षीस रुपये

1) तालुका पातळी –5 हजार–3 हजार –2 हजार

2) जिल्हा पातळी — 10 हजार–7 हजार– 5 हजार

3) विभाग पातळी– 25 हजार– 20 हजार– 15 हजार

4) राज्य पातळी– 50 हजार– 40 हजार– 30 हजार

- Advertisment -

ताज्या बातम्या