Sunday, May 19, 2024
Homeजळगावचतुरस्र दीदी

चतुरस्र दीदी

लताजी आणि रफीजी नसते तर लक्ष्मीकांत-प्यारेलालही नसते. व्यक्ती म्हणून लतादीदी खूप साध्या. बोलताना समोरच्या व्यक्तीला त्या खूप महत्त्व द्यायच्या. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात राहिलो. इतर संगीतकार दीदींच्या गाण्यासाठी तयार शास्त्रीय बंदिशी वापरत; पण आम्ही तसं कधीच केलं नाही. दीदींनी आमच्या अनेक सुरावटीत प्राण फुंकले. अनेक गाण्यांची सुरांची उतरण त्यांनी इतक्या सुंदरपणे सादर केली आहे, की ऐकत राहावेसे वाटते.‘ये कौन हंसा’हे गाणे तर मी विसरूच शकणार नाही. ‘मेरे साजन’ चित्रपटात ते गाणे राखी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे लतादीदींच्या सर्वोत्तम सादरीकरणांपैकी एक आहे, असे मी मानतो. संगीतकार म्हणून आम्ही फक्त हास्याची कल्पना सांगू शकलो; परंतु लतादीदींनी ते हसणे जिवंत केले.

पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणजे बाळासाहेब हे आमचे खूप चांगले मित्र. आम्ही ‘सुरेल कला केंद्र’ नावाचा एक संगीतसमूह सुरू केला होता. त्यामुळं 1951 ते 1957 या काळात मंगेशकर कुटुंबियांशी आमच्या सातत्याने भेटीगाठी व्हायच्या. साहजिकच लतादीदींसाठी आम्ही अनोळखी नव्हतो. 1960 मध्ये ‘चंद्रसेना’ चित्रपटापासून आम्ही कल्याणजी-आनंदजींचे साहाय्यक म्हणून काम करु लागलो, ते 1965 मध्ये ‘हिमालय की गोद मे’ पर्यंत. यामुळं लताजींना गाण्यासाठी विचारणा करणं ही आम्हाला फार मोठी गोष्ट वाटायची नाही. घरातल्या व्यक्तीला विचारण्याइतकं आपलेपण आमच्यात निर्माण झालं होतं. यासाठी आम्हाला पहिली संधी मिळाली ती ‘हम,तुम और वोह’ या चित्रपटाच्या निमित्तानं. पण तो चित्रपट पूर्ण झाला नाही. पुढे 1963 मध्ये बाबूभाई मिस्रींच्या ‘पारसमणी’ या चित्रपटाच्या निमित्तानं दुसरी संधी मिळाली. ‘हसता हुआ नूरानी चेहरा’ हे लतादीदींसमवेत आम्ही केलेलं पहिलं गाणं. लताजी आणि कमल बारोट यांनी ते गायिलं. त्या काळात संगीतकार 20 किंवा 30 व्हायोलिन वापरत असत. आम्ही या गाण्यासाठी 36 व्हायोलिन वापरली. सर्वांना मागे टाकण्याचा, लहान मुलांसारखा खुळा उत्साह आमच्यात होता. परंतु रेकॉर्डिंगनंतर लताजींनी आमचं कौतुक करून आम्हाला आशीर्वाद दिले होते. लताजी आणि रफीजी नसते तर लक्ष्मीकांत-प्यारेलालही नसते. व्यक्ती म्हणून लतादीदी खूप साध्या. बोलताना समोरच्या व्यक्तीला त्या खूप महत्त्व द्यायच्या. आम्ही सतत त्यांच्या संपर्कात राहिलो. इतर संगीतकार दीदींच्या गाण्यासाठी तयार शास्त्रीय बंदिशी वापरत; पण आम्ही तसं कधीच केलं नाही. आम्हा दोघांनाही शास्त्रीय संगीताचं रीतसर प्रशिक्षण मिळालं नव्हतं. तथापि, शास्त्रीय संगीताच्या मैफलींना आम्ही जात होतो. पंडित रविशंकर यांच्या ‘हाय रे वो दिन क्यूं ना आए’ या बंदिशीच्या कलावती रागातील सौंदर्याने आम्हाला आकर्षित केले. परंतु याच रागात जेव्हा ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटात ‘मेघवा गगन बीच झांके’ गीत रचले तेव्हा त्यात बदल केले. ‘सत्यम शिवम सुंदरम’च्या शीर्षक गीतासाठी लतादीदींना साथसंगत करण्यासाठी आम्ही 100 वादक कलावंतांचा ताफा आणला होता.

शांत, मृदू स्वर लाभलेल्या लताजींना आम्ही कॅबरेचे गाणे म्हणण्यासाठी तयार कसे केले याचे अनेकांना आश्चर्य वाटते. परंतु त्यांना तयार करण्यासाठी आम्हाला काही करावे लागले नाही. आम्ही कमी दर्जाची धून त्यांना गायला लावणार नाही, अशी लताजींना खात्री होती. 1967 मध्ये मी लेबनॉनमध्ये गेलो होते तेव्हा प्रसिद्ध अरबी गायिका फेरोजला भेटलो होतो. ती आणि तिच्या पतीने त्यांच्या संगीताची ओळख करून दिली. त्यातूनच ‘आ जाने जा’ या कॅबरे गाण्यातही मृदू सुरावट वापरण्याची शैली आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. अशा प्रकारच्या सुरावटी गाण्यात लताजी खूपच तरबेज होत्या. त्यांनी आमच्या सुरावटीत प्राण फुंकले. त्यातील सुरांची उतरण त्यांनी इतक्या सुंदरपणे सादर केली आहे, की ऐकत राहावेसे वाटते. पुढे पडद्यावर हे नृत्य सादर करणार्‍या हेलन आणि कोरिओग्राफर पी. एल. राज यांनीही या गाण्यात जीव ओतला. नायिका, आई, बहीण, मूल, आजी अशा प्रत्येक पात्रासाठी आम्ही त्यांना गाणे गायला सांगितले. एवढेच काय, शक्य असते तर नायकासाठीही त्यांना गायला सांगितले असते. छोटा भाई चित्रपटातील ‘माँ मुझे अपने आँचल में छुपा ले’(छोटा भाई) या गाण्यात त्या एका लहान मुलासाठी गायल्या. ‘यशोमती मैया से’ (सत्यम शिवम सुंदरम) हे गाणे त्यांनी लहान मुलीसाठी गायिले. ‘बिदाई’ चित्रपटात त्यांनी वयोवृद्ध दुर्गा खोटे यांना आवाज दिला. यातील प्रत्येक गाणे वेगळे वाटते, हीच गायिका म्हणून लतादीदींची थोरवी आहे.

- Advertisement -

‘ये कौन हंसा’हे गाणे तर मी विसरूच शकणार नाही. ‘मेरे साजन’ चित्रपटात ते गाणे राखी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हे गाणे लतादीदींच्या सर्वोत्तम सादरीकरणांपैकी एक आहे, असे मी मानतो. संगीतकार म्हणून आम्ही फक्त हास्याची कल्पना सांगू शकलो; परंतु लतादीदींनी ते हसणे जिवंत केले. त्याचप्रमाणं लतादीदी आणि किशोरदा यांनी गायिलेलं ‘सारेगमप’ (अभिनेत्री) हे मला आतापर्यंतचे सर्वांत सुंदर प्रेमगीत वाटते. ‘वो है जरा खफा खफा’ या गाण्यातील लतादीदी आणि रफीजी यांची केमिस्ट्रीही कायम स्मरणात राहील.

प्यारेलाल

सुप्रसिद्ध संगीतकार

- Advertisment -

ताज्या बातम्या