Thursday, May 2, 2024
Homeनाशिकभुजबळांच्या भाजप आमदारांना 'स्मार्ट' कानपिचक्या

भुजबळांच्या भाजप आमदारांना ‘स्मार्ट’ कानपिचक्या

नाशिक । प्रतिनिधी

स्मार्ट सिटी प्रमाणे गोदावरीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करत तिला स्मार्ट करा व शहरातील उघडयावरील तारा भुमिगत करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत निधी उपलब्ध करुन द्या, अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका आयुक्त व भाजप आमदारांना कानपिचक्या दिल्या…

- Advertisement -

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार अॅड.राहुल ढिकले व आ.सिमा हिरे यांनी वरील मुद्दे उपस्थित केल्यावर भुजबळांनी स्मार्टपणे त्यांचे मुद्दे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपच्या कोर्टात टोलवले.

आ.ढिकले यांनी त्यांच्या मतदारसंघातील धार्मिक पर्यटन स्थळ विकासाचा प्रश्न मांडत ‘ब’ वर्गात समावेश करावा अशी मागणी केलि. हाच धागा पकडत भुजबळांनी गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला.

भाविक गोदेचे पवित्र जल घरी नेतात. पण गोदावरी मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करण्याचे पाप करु नका, असे सुनवले. आयुक्तांनी तत्काळ लक्ष घालत स्मार्ट सिटी प्रमाणे गोदावरीही स्मार्ट करा, असे सांगत सत्ताधारी भाजपचे कान पिळले.

तसेच आ.हिरे व आ.ढिकले यांनी उघडया भुमिगत तारांच्या उपस्थित केलेल्या मुद्यावरुन देखील दोन्ही भाजप आमदार व मनपा आयुक्तांना टोले लगावले. केंद्रातील भाजप सरकार स्मार्ट सिटी योजना राबवत आहे.

मग आ. हिरे आणि आ. अॅड. ढिकले यांच्या मतदार संघातील लटकलेल्या ओव्हर हेड विज तारांचा प्रश्नही यातूनच सोडवा. शहरात लटकलेल्या विजेच्या तारा, इकडे वायर, तिकडे वायर हे चित्र काही बरोबर दिसत नाही.

पण आपण केंद्र सरकारचा स्मार्ट सिटी उपक्रम राबवित आहोत. त्यामुळे स्मार्ट सिटी उपक्रमांत या वंगाळवाण्या दिसणाऱ्या ओव्हरहेड वीज तारांचा प्रश्न सोडवा अशा कानपिचक्या दिल्या.

कुंभमेळ्यासारखे शहर सजवा

साहित्य संमेलनसाठी साहित्यिकांसह पर्यटक येणार आहेत. त्यामुळे आपण आपलं नाशिक हे सुंदर नाशिक करावे. रस्ते स्वच्छ करा.पर्यटनीय स्थळे स्वच्छ करुन आकर्षक पध्दतिने सुशोभित करा. तेव्हा कुठे पर्यटक भेट देतील. कुंभमेळ्यासाठी निमित्ताने शासन स्तरावरुन निधी घेतोच. त्यामुळे संमेलनाच्या निमित्तानेही नाशिकला सुंदर कऱण्याची संधी सोडू नका असा सल्ला त्यांनी मनपातील भाजप सत्ताधार्‍यांना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या