Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal: शरद पवार यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं? छगन भुजबळ...

Chhagan Bhujbal: शरद पवार यांनी दिलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं? छगन भुजबळ म्हणाले, “ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ”

नाशिक | Nashik
पुण्यात अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी कार्यक्रमात शरद पवार यांनी छगन भुजबळ शेजारी बसलेले असताना काहीतरी लिहून दिल्याचे दृश्य सर्वांना दिसले. त्यांच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले गेले होते. पवारांनी लिहीलेल्या आणि भुजबळांनी वाचलेल्या त्या कागदामध्ये असे काय लिहीलेले होते याची सर्वांनाच उत्सुकता होती. याबद्दल आता खुद्द छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.

आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक विषयांवर भुमिका मांडली. त्यावेळी त्यांना त्या चिठ्ठीबद्दलही विचारण्यात आले. त्या दिवशी कार्यक्रमात शरद पवार यांनी तुम्हाला चिठ्ठी दिली, त्यात काय होते असे प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला होता. ” त्यावर काय लिहिले ते सांगू? ते परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ ” असे म्हणत छगन भुजबळ मनसोक्त हसले आणि त्यांनी मोठ्या खुबीने तो प्रश्न टोलावून लावला. पर्दा ना उठाओ, असे तुम्ही म्हणताय की पवारांनी त्या चिठ्ठीत तसे लिहीले होते, असा सवाल तरीही एकाने विचारलाच. त्यावरही भुजबळ म्हणाले., मी सांगितले ना, उत्तर दिले की आता, असे हसत हसत म्हणत त्यांनी त्यांनी विषयाला बगल दिली. पुण्यातील त्या कार्यक्रमात पवार-भुजबळ यांच्यात त्या चिठ्ठीतून नेमके काय बोलणे झाले हे गुपित गुलदस्त्यातच राहिले आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाले भुजबळ?
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. पण फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले मी पूर्ण चौकशी करणार. चौकशीत कोण सापडले, आका काय, काका काय त्या सर्वांवर कारवाई करू. त्या आधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहात? असा सवाल त्यांनी विचारला. जोपर्यंत चौकशीतून काही येत नाही. तोपर्यंत राजीनामा मागणे चुकीचे आहे. मला हे बरोबर वाटत नाही. साप साप म्हणत भुई धोपटणे योग्य नाही, असेही भुजबळांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटलांवर टीका
दरम्यान, भुजबळ यांनी यावेळी जरांगे यांच्यावर देखील टीका केली. जरांगे ज्या पद्धतीने बोलतात ते योग्य नाही ही लोकशाही आहे ठोकशाही नाही. तुम्ही कायदा हातात घ्यायची काही गरज नाही. जरांगेचे म्हणाल तर धनंजय मुंडे जरांगेचे उपोषण सोडविणायायाठी गेले होते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील, असेही छगन भुजबळ म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...