Friday, July 5, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले,"मी नाराज…"

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले,”मी नाराज…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक (Rajya Sabha By Election) होत आहे. आज या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यांनतर अखेर या जागेसाठी सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेसाठी इच्छुक असणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचा पत्ता कट झाला आहे.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज

यावरून राजकीय वर्तुळात भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यावर आता भुजबळांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो. पंरतु, माझ्याबरोबर आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी यांच्यासह आणखी नेते इच्छुक होते. पंरतु, शेवटी चर्चेअंती आम्ही सगळ्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने नाराज नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.

हे देखील वाचा : ‘पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…’ ;रोहित पवारांचा अजित पवारांना सल्ला

पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, “काल मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. या बैठकीत पूर्णपणे विचार होऊन विचारांती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभे करायचे आहे, असा निर्णय झाला. त्यामुळे आज सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरायचा असून हा निर्णय सर्वानुमते झालेला आहे”, असेही भुजबळ यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या