Friday, May 3, 2024
Homeनाशिकबैठकीला जाण्याआधी पालकमंत्री भुजबळांनी केली गर्दीच्या ठिकाणी पाहणी; पाहा फोटो

बैठकीला जाण्याआधी पालकमंत्री भुजबळांनी केली गर्दीच्या ठिकाणी पाहणी; पाहा फोटो

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची महत्वाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांसोबत पार पडणार आहे. नाशिकमध्ये लॉकडाऊन होणार की काही दिवस आणखी थांबायला लागेल याबाबतचा निर्णय आज भुजबळ जाहीर करणार आहेत.

- Advertisement -

बैठकीला जाण्याच्या आधी नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी भुजबळ यांनी केली. यामध्ये प्रामुख्याने राणाप्रताप चौक, उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको, शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड येथे भुजबळांचा ताफा गेला होता. शहराचा अंदाज घेऊन थोड्याच वेळात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या सोबत भुजबळ आढावा घेतील. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या