नाशिक | प्रतिनिधी | Nashik
- Advertisement -
छात्रभारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिक येथे आलेल्या छत्रपती खा. संभाजीराजे भोसले यांना निवेदन देऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला…
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील मराठा आरक्षण सुनावणीला न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी तरुण हा शैक्षणिक प्रश्नाला अधिक आक्रोशीत होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपण यावर काही मार्ग काढून मराठा समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी छत्रपती संभाजी राजे भोसले यांना करण्यात आली.
निवेदनावर राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, राज्य संघटक समाधान बागुल, शहराध्यक्ष देविदास हजारे, सदाशिव गणगे, आशिष क़ळमक़र, साहिल मनियार आदींच्या सह्या आहेत.