Thursday, May 2, 2024
Homeनगरछत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस पोलिसांकडून मनपाला परवानगी

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस पोलिसांकडून मनपाला परवानगी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी व मनपा मुख्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. जावळे व पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. शासनाकडेही दोन्ही पुतळ्यांच्या उभारणीसाठी परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. जावळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या