Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)आज नाशिक दौर्यावर येणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंंत त्यांचे भरगच्च कार्यक्रम निर्धारित केलेले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांचे सकाळी 10 वा ओझर विमानतळावर आमगन होईल. त्यांनंतर ते गंजमाळ येथे खा. हेमंत गोडसे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले जार्ईल. जिल्ह्यातील पहील्याच पक्ष कार्यालयाचे उदघाटन होणार आहे.

त्यानंंतर मुख्यमंत्री नाशिकरोड कडे रवाना होतील. नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालय आवारत स्थापन झालेल्या सारथी कार्यालायचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.11 वा. पळसे येथील नाशिक साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हांगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कालीदास कला मंदीरात होणार्‍या गुण गौरव सोहळ्यास उपस्थीत राहणार आहेत. गुणगौरव सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील. शिंदे यांच्या दौर्यच्या पार्श्वभुमीवर पोलीसांनी कडेकोटे बंदोबसत् तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालकमंत्र्यांद्वारेे मनपा, जिल्हा परिषद आढावा

पालकमंत्री दादा भुसे सकाळी 8 वाजता पोलिस परेड मैदानावर पोलिस स्मृती दिन परेडला संबोधित करतील. त्यानंतर 9 वा. महापालिकेत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेणार आहे. या बैठकीत सिडकोतील 28 हजार सदनिका फ्री होल्ड करणे, झोपडपट्टीत एसआरए स्कीम राबवणे, घरपट्टीच्या वाढीव दराचे पुनर्विलोकन, जुन्या वाड्यांच्या विकासासाठी कलस्टर डेव्हलेंपमेंट या महत्वाच्या प्रश्नावर ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

तसेच शासनाकडे महापालिकेचा रखडलेला आकृतीबंध, पुररेषेचे नव्याने सर्वेक्षण करुन 50 मीटरच्या आत रेषा निश्चित करणे, सिडको व पंचवटी विभागात 200 खाटांचे नवीन रुग्णालय बांधणे हे मुद्दे देखील चर्चेत येण्याची शक्यता आहे. आगामी सिंहस्थाचे नियोजन व आराखड्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

शहरातील मुख्यमंत्र्यांच्या विविध कार्यक्रमांनंतर दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या