Thursday, May 2, 2024
Homeजळगावमुख्यमंत्री शिंदे 3 जूनला जिल्हा दौर्‍यावर येणार

मुख्यमंत्री शिंदे 3 जूनला जिल्हा दौर्‍यावर येणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी (Government at your door) हे अभियान (campaign) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना (beneficiaries) शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांचा 3 जून रोजी संभाव्य जिल्हा दौर्‍याचे (district tour) नियोजन करण्यात येत आहे. याकरीता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने लाभ देण्यात येणार्‍या लाभार्थींची निवड प्राधान्याने करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी आज दिल्या आहेत.

- Advertisement -

व्वा रे, विद्यापीठाचा कारभार! MBA च्या
परीक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका…

शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते.

100 लाभार्थी कार्यक्रमाला राहणार उपस्थित

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणार्‍या विविध शासकीय योजनांची यादी तयार करावी.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाच्या 100 लाभार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे नियोजन करावे. जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी शिबिरांचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाचा असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही मित्तल यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या