Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

तालुक्यातील खडांगळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ६ वर्षांचा बालक जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. शिव संपत बोस असे हल्ला झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

खडांगळीच्या सरपंच कल्पना नवनाथ ठोक यांच्या वस्तीजवळ संपत बोस यांचे कुटुंबीय राहतात. सकाळच्यावेळी बोस व परिसरातील शेतकरी शेतात काम करत होते. शिवही त्यांच्याजवळ खेळत होता. यावेळी अचानक मक्याच्या पिकात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिववर हल्ला केला. बिबट्याने शिववर केवळ झडप टाकली. मात्र, शिवच्या आसपासच कुटुंबीय व इतर शेतकरी असल्याने त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने शिवला सोडून तेथून धूम ठोकली.

या हल्ल्यात शिवच्या कपाळाला व पाठेला बिबट्याचे नख लागल्याने तो जखमी झाला. सुदैवाने त्याच्याजवळ कुटुंबीय असल्याने मोठा अनर्थ टळला. वनविभागाला माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या सेवकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

जखमी झालेल्या शिवलाही उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून या घटनेने शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाकडून याची दखल घेत तात्काळ परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

धडक

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...

0
अमरावती | Amaravatiनवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला समृद्धी...