Sunday, May 19, 2024
Homeजळगावएकांकिका स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाची ‘मॅडम’ प्रथम

एकांकिका स्पर्धेत चोपडा महाविद्यालयाची ‘मॅडम’ प्रथम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या (Nutan Maratha College) विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत (Intercollegiate one-act play competitions) चोपडा येथील महात्मा गांधी संस्थेच्या महाविद्यालयाची (Mahatma Gandhi Sanstha’s college) ‘मॅडम’ (‘Madam’) ही एकांकिका प्रथम (first) आली आहे.

- Advertisement -

या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ विधी तज्ञ अ‍ॅड.सुशील अत्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष क.ब.चौ.उमविचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख होते. व्यासपीठावर डॉ.सुनील कुलकर्णी, प्रा.डॉ.विजय लोहार,उपप्राचार्य डॉ.एन.जे.पाटील, प्रा. डॉ.राहुल संदनशिव, पीयूष रावळ, योगेश पाटील, अपूर्वा कुलकर्णी आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

एकांकिका स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, उपप्राचार्य डॉ. एन.जे.पाटील,उपप्राचार्य प्रा.राजेंद्र देशमुख, प्रा.डॉ.विजय लोहार, प्रा.डॉ राहुल संदनशिव, पियुष रावळ, योगेश पाटील,अपूर्वा कुलकर्णी उपस्थित होते.

सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.राजेंद्र देशमुख तर आभार डॉ.अफाक शेख यांनी मानले.

सांघिक एकांकिका स्पर्धेत प्रथम चोपडा (Chopada) येथील महात्मा गांधी महाविद्यालयाची (Mahatma Gandhi Sanstha’s college) एकांकिका ‘मॅडम’ द्वितीय भुसावळ येथील पी.ओ.नहाटा महाविद्यालयाची (P.O. Nahata College at Bhusawal) एकांकिका ‘मुंग्या’, तृतीय मुळजी जेठा महाविद्यालयची ( M J COLLEGE) एकांकिका ‘प्रेमा’ तर उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक एनटीविएस कॉलेज, नंदुरबारची एकांकिका बेगर्स फॉर डॉक्टर, दिग्दर्शन प्रथम दिमाने पठार, उत्कृष्ट लेखन प्रथम रुपाली पाटील, नेपथ्य प्रथम हर्षल निकम, प्रकाश योजना प्रथम विशाल गाडीलोहार, पार्श्वसंगीत प्रथम स्वप्निल ननवर, रंगभूषा स्वप्नील डोळसे, अभिनय पुरुष प्रथम दर्शन गुजराती, तर अभिनय महिला प्रथम गौरी चौधरी, अभिनय प्रमाणपत्र सिद्धांत सोनवणे, प्रज्ञा बिर्‍हाडे, उमेश गोरदे, सोनल पगारे, रचना अहिरराव, हितेशा हडप यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या