Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारसिने अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टीव्हलचे ब्रँड अँबेसेडर

सिने अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टीव्हलचे ब्रँड अँबेसेडर

सारंगखेडा | वार्ताहर- SARANGKHEDA

सारंगखेडा( Sarangkheda) ता.शहादा येथील श्री.एकमुखी दत्त यात्रेनिमित्त (Shri. Ekmukhi Dutt Yatra) भरणार्‍या अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलच्या (Horse market and Chetak festival) उद्घाटनासाठी (inauguration) चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष (Chetak Festival Committee Chairman) जयपालसिंह रावल (Jaipal Singh Rawal) यांनी अभिनेता सोनू सुद (Actor Sonu Sud) यांना निमंत्रण (invitation) दिले आहे. सोनू सुद हे चेतक फेस्टिव्हलचे ब्रॅड ऍम्बेसेडरही (Brad Ambassador of Chetak Festival) होणार आहेत, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

- Advertisement -

येथील चेतक फेस्टिव्हल ज्याप्रमाणे अश्वशौकिनांना भूरळ घालत असते, त्याचप्रमाणे बॉलिवुड आणि हॉलिवूड तारकांनाही भूरळ घालत असतो. यंदाही सारंगखेडा येथील श्री.एकमुखी दत्त यात्रोत्सवानिमित्त अश्वबाजार व चेतक फेस्टिव्हलची तयारी सुरू झाली आहे.

चेतक फेस्टिव्हलचे उद्घाटन दि.८ डिसेंबरला अभिनेता सोनु सुद यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी मुंबई येथे अभिनेता सोनू सुद यांच्या निवासस्थानी भेट देऊन निमंत्रण दिले आहे.

यावेळी अश्व बाजाराची व चेतक फेस्टिव्हलची श्री.रावल यांनी माहिती दिली. येथे २०१२ पासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात श्री.दत्त प्रभूच्या जयंतीनिमित्त यात्रोत्सवात चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते . दरवर्षी सिनेसृष्टीतील कलाकार येतात. यंदाही विविध कलाकारांना निमंत्रण दिले जाणार आहे, अशी माहीती समितीने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या