Wednesday, July 24, 2024
HomeनाशिकNashik News : सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

Nashik News : सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक शहराची प्रमुख वाहतुकीची सुविधा असलेल्या सिटी लिंक (Citilinc) बसच्या वाहकांनी आज पुन्हा एकदा संप पुकारला आहे. ठेकेदाराने थकीत वेतन अदा करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आज पहाटेपासून वाहक पुन्हा संपावर गेले आहेत. त्यामुळे सकाळपासून आतापर्यंत एकही बस रस्त्यावर धावली नाही….

गेल्या काही दिवसांपूर्वी सिटीलिंक (Citilinc) बसच्या वाहकांनी वेतन अभावी संप पुकारला होता. त्यावेळी प्रभारी मनपा आयुक्त बानायत यांनी कंपनी प्रतिनिधी व ठेकेदार यांची बैठक घेऊन दोन दिवसांत मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदाराने आदेश मान्य करून 21 जुलैपर्यंत पगार देणार, असे आश्वासन दिले होते.

Nitin Desai Funeral : जिथे घालवले अखेरचे क्षण, त्याच ठिकाणी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

मात्र ठेकेदाराने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे वाहकांनी आज पुन्हा एकदा संप पुकारला आहे. सकाळपासून बस बंद असल्यामुळे प्रवासी, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे. सर्व वाहक तपोवन डेपोत एकत्र आले असून अधिकारी वर्ग संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशकात चोरट्यांची दुचाकींवर नजर

- Advertisment -

ताज्या बातम्या