Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादचे सौंदर्यकरण टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करा-पालकमंत्री भुमरे

औरंगाबादचे सौंदर्यकरण टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करा-पालकमंत्री भुमरे

औरंगाबाद – aurangabad

शहरात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहे. यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Guardian Minister Sandipan Bhumre) यांनी आज G-20 निमित्त झालेल्या सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे विविध कामांची पाहणी केली.

- Advertisement -

सेवा हक्क कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करा-आयुक्त दिलीप शिंदे

सदरील पाहणी दौऱ्याची विमानतळापासून सुरुवात होऊन बीबी का मकबरा या ठिकाणी सांगता झाली.यावेळी पालकमंत्री महोदयांनी सुशोभीकरण साठी लावण्यात आलेल्या झाडे उन्हामुळे सुकून जाऊ नये याची काळजी घेण्याची सूचना दिली.

यावेळी त्यांच्या समवेत मा.सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डये, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, तसेच एमएसइबी चे चीफ इंजिनियर, महापालिका अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, रवींद्र निकम, शहर अभियंता ए बी देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चीफ इंजिनियर तसेच महापालिकेतील आणि एमएसईबी व सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

सेवा हक्क कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करा-आयुक्त दिलीप शिंदे

- Advertisment -

ताज्या बातम्या