Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळ्यात आयुक्तांना आणला चपलांचा हार

धुळ्यात आयुक्तांना आणला चपलांचा हार

धुळे । प्रतिनिधी dhule

परिसरात दहा दिवसापासून पाणी येत नाही म्हणून आक्रमक झालेल्या समाजवादी पक्षाने आज (Municipality) महापालिकेत अनोखे आंदोलन केले.

- Advertisement -

एकाचवेळी महापालिका प्रशासनाला गुलाब पुष्पही द्यायचे आणि त्याचवेळी चपलांचा हारही घालायचा असा आंदोलकांचा डाव होता. मात्र (police) पोलिसांनी तो हणून पडला.

समाजवादी पक्षाचे नेते व नगरसेविका पुत्र डॉ.सरफराज अन्सारी यांच्या सह नागरिकांनी हे आंदोलन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार शहरात मनपा प्रशासनाकडून रोटेशन पध्दतीने पाणीपुरवठा केला जातो. मात्र या रोटेशनमध्ये खोडा घालण्याचे काम प्रशासनाकडूनच केले जात आहे.

देवपूर भागाला अवध्या तीन दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात आला आहे. देवपूरातील पाणीपुरवठ्याबाबत इतकी तत्परता दाखविली म्हणून आम्ही मनपा प्रशासनाचे गुलाबपुष्प देवून सत्कार करीत आहोत. मात्र या कृतीमुळे पाण्याचे नियोजन चुकले.

प्रभाग क्र.१२ मध्ये जामचा मळा भागात १० दिवस उलटल्यानंतरही पाणी नाही, त्यामुळे महापालिकेच्या या कृतीचा आम्ही धिक्कार करीत

आहोत. आमच्याकडून चपलांचा हार त्यांना भेट देत असल्याचे डॉ.अन्सारी म्हणाले. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास मनपात डॉ. अन्सारी व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर हे आंदोलन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या