Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसावधान ; तीन दिवस धोक्याचे!

सावधान ; तीन दिवस धोक्याचे!

औरंगाबाद – aurangabad

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्यापासून अर्थात २९ ते ३१ मार्चदरम्यान औरंगाबादसह काही ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट (Heat wave) येणार आहे. यंदाच्या मोसमात कमाल तापमान प्रथमच ४१ ते ४३ अंश सेल्सियस उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यात आकाश निरभ्र राहते. सूर्य तळपू लागतो व तापमानात किंचित बदल होतात. पण ग्लोबल वार्मिंगमुळे हवामानात वेगाने व अनपेक्षित बदल होत आहेत. त्यामुळेच फेब्रुवारी, मार्चमध्येही ढगाळ वातावरण अधिक काळ राहिले व जेथे पोषक वातावरण तेथेच मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडला. यामुळे कमाल व किमान तापमानात २ ते ३ अंशांपर्यंत घट झाली होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले. वादळी वारे वाहिले. कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागांत पाऊस पडला. आता तीन दिवसांपासून पुन्हा सूर्य तळपू लागला आहे. उष्ण वारे वाहून येत आहेत. त्यामुळे कमाल व किमान तापमानात २ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. तर २९ ते ३१ मार्च दरम्यान औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, अहमदनगर (Aurangabad, Jalna, Hingoli, Parbhani, Ahmednagar) आदी जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

अशी घ्या काळजी

दुपारच्या वेळी गरज असेल तरच बाहेर पडा. कानाला पांढरा रुमाल अथवा डोक्यावर टोपी घालावी. बाहेर फिरताना ढसाढसा पाणी पिऊ नये. उन्हाच्या झळा पासून बचावासाठी अंग पूर्ण झाकून घ्यावे. शक्यतो हलके कपडे वापरावे. बाहेरचे अशुद्ध पाणी, अतिथंड पाण्यापासून तयार केलेले बर्फाचे पाणी, ज्यूस, सरबत आदी पेय टाळावे. यामुळे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते. पशुधन सावलीत बांधावे.

कशामुळे येतेय उष्णतेची लाट?

राजस्थानपासून (gujrat) गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आहे. या भागातून थेट महाराष्ट्राकडे आणि मुख्यत: कोकण विभागात कोरडे-उष्ण वारे येत आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात पावसाळी वातावरण होते. दिवसा आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ होती. त्यामुळे सूर्यकिरणांना अडथळा होता. सध्या निरभ्र आकाश आहे. त्यामुळे मुळातच तापमानात वाढ झाली असताना वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी दिवसाच्या कमाल तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या