Friday, May 3, 2024
Homeनाशिकदेवळालीत 'इतक्या' नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

देवळालीत ‘इतक्या’ नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटलच्या वतीने गुरुवारी प्रतिबंधात्मक मात्रा मॅरेथॉन अंतर्गत डॉक्टर्स, शिक्षकांसह गरजू ज्येष्ठ नागरिकांना कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस (Booster Dose) ३९७ नागरिकांना देण्यात आला…

- Advertisement -

मोहिमेचा शुभारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा होनराव (Dr. Manisha Honrao) यांना सर्वात प्रथम तिसरा डोस देत करण्यात आला. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आरोग्य, अग्रभागी काम करणाऱ्या व्यक्ती, तसेच ६० वर्षांवरील व्यक्ती ज्यांना गंभीर आजार आहे व ज्यांचा दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले नागरिकांना या तिसऱ्या डोसचे लसीकरण (Vaccination) करण्यात आले.

करोनाविरुद्धच्या (Corona) लढ्यात लस हे एकमेव शस्त्र असल्याने या लसीपासून तयार होणारी प्रतिकारशक्ती काही महिन्यांनंतर कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत लसीचा बूस्टर डोस आवश्यक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने (Union Ministry of Health) स्पष्ट केले आहे. याशिवाय ओमायक्रॉन (Omicron) या प्रकाराने त्याची गरज अधिकच वाढवली आहे.

या मोहिमेसाठी डॉ. शाहू पाटील, डॉ. मनीषा होनराव, डॉ. सोनिया कदम, डॉ. जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर आरती माटकर, सुरेखा माळोदे, रोहिणी गाडेकर, सुशांत जगताप, दिनेश कांबळेकर, योगेश वाघमारे, सुनील पावशे, सागर जाधव, वर्षा घुसळे, मीना गवळे, तेजस्विनी शिंदे, मेघा रोकडे, सुमित कांडेकर, अर्चना पारचा, परवीण इनामदार, कविता वाघ, गणेश गोडसे, शुभम ढेरिंगे, सागर पवार आदी परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या