Friday, May 3, 2024
Homeधुळेशहर अनलॉक होताच...रस्त्यावर गर्दीच गर्दी

शहर अनलॉक होताच…रस्त्यावर गर्दीच गर्दी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेतर्फे चार दिवस धुळ्यात जनता कर्फ्यू लागू केलेला होता. परंतु लॉकडाऊन नंतर शहर ऑनलॉक झाल्यावर आज शहरातील सर्व रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसून आली. बाजारपेठेत कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळण्यात आले नाही.

- Advertisement -

बाजार समितीतही खरेदीसाठी गर्दी

जनता कर्फ्यूमुळे धुळे बाजार समिती तीन दिवसापासून बंद होती. आज शहर ऑनलॉक झाल्यानंतर बाजार समिती सूरु झाली. त्यामुळे बाजार समितीत खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी बाजार समितीत कोरोना रुग्ण आढळल्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्यात आलेली होती. परंतु आज याच बाजार समितीत गर्दी दिसून आली. कुठल्याही प्रकारचे शासकीय नियम पाळण्यात आले नाही. सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसून आला.

जनता कर्फ्यूत दुकान उघडणार्‍या आग्रा रोडवरील व्यापार्‍यावर गुन्हा

धुळे शहरात महापालिकेतर्फे जनता कर्फ्यु लागू असतांना आग्रारोडवरील चिमनलाल शिवदास हे किराणा दुकान उघडून व्यवसाय करणार्‍या किशोर रिजवानी या व्यापार्‍याच्या विरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आला.

सर्व दुकाने बंद ठेवण्याचे शुक्रवारी दुपारी 4 वाजेपासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत महापालिकेतर्फे जनता कफ्यू लागू केला होता. त्याला जनतेने आणि व्यापार्‍यांनीही पाठींबा दिला.

मात्र शहरातील मुख्य बाजारपेठ आग्रारोडवरील चिमनलाल शिवदास किराणा दुकान दि. 26 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास उघडून व्यवसाय करतांना किशोर रिजवानी हा व्यापारी आढळून आला. त्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रतिबंधक आदेशाचा भंग केला म्हणून पोना उमेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या