Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशसशस्त्र दलांमध्ये मोठा संघर्ष; २७ जणांचा मृत्यू तर १०६ जण जखमी

सशस्त्र दलांमध्ये मोठा संघर्ष; २७ जणांचा मृत्यू तर १०६ जण जखमी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

लीबियातून (Libiya Clash) एक मोठी बातमी समोर येत आहे. देशाची राजधानी असलेल्या त्रिपोली शहरात (Tripoli City) दोन सशस्त्र गटांमध्ये भीषण चकमक झाली. या हिंसाचारात तब्बल २७ जणांचा प्राण गेला असून, १०६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांदरम्यान सोमवारपासून मोठे युध्द सुरु आहे. ब्रिगेड ४४४ चे कमांडर महमुद हमजा यांना त्रिपोलीच्या मुख्य मितिगा एअरपोर्टवरुन ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर दोन्ही गटांमध्ये हिंसाचार सुरु झाला. दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टिका; म्हणाले गेल्या एक वर्षापासून…

दरम्यान, या हिंसाचारात जखमी झालेल्यांमध्ये सामान्य नागरीकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या हिंसाचारानंतर संयुक्त राष्ट्रांनी मान्यताप्राप्त राष्ट्रीय एकता सरकारशी केलेल्या करारानंतर हमजाला तटस्थ पक्षाकडे सोपवण्यात आले. यासोबतच त्रिपोलीमधील सर्व लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णयही सरकारने घेतला. यानंतर या दोन्ही टोळ्यांमधील लढाई थांबली.

Chandrayan-3 Mission: चांद्रयान ३ चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं; आता प्रॉपल्शन आणि लँडर होणार वेगळे

सोमवारी झालेला हिंसाचार हा आत्तापर्यंत झालेला वर्षातील सगळ्यात गंभीर हिंसाचार मानला जात आहे. युनायटेड नेशन्स सपोर्ट मिशन इन लिबिया (UNSMIL) ने सांगितले की ते कालपासून त्रिपोलीमधील सुरक्षा घटनांवर आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या