नाशिक | प्रतिनिधी
राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यातच आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात मोठा वाद झाला.
या बैठकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त कार्यकर्त्यांना संबोधन करताना वसंत गीते यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे आत्मचिंतन करतना ग्रामीण जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांनी बोलताना वसंत गिते यांच्या पराभवाच्या कारणांमध्ये एमडी ड्रग्जचा मुद्दा चुकीच्या पध्दीतीने उपस्थित झाल्याने त्यांचा निवडणुकीत पराभव झाला असे सांगितले.
विधानसभा निवडणुकीदरम्यान शहरातील विविध मुद्द्यांच्या चर्चेमध्ये एमडी ड्रग्जचा मुद्दा घेऊ नये असे सातत्याने आपण वसंत गीते यांना सांगत होतो मात्र विनायक पांडे यांनी विषय लावून धरल्याने पराभवासाठी ते एक कारण ठरले असल्यास मत व्यक्त दिंडे यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर बसलेले विनायक पांडे यांनी दिंडे यांना याबद्दल जाब विचारला व अर्वाच्च शब्दात भर सभेत पाण उतारा केला. या घटनेत विनायक पांडे यांना राग अनावर झाला असता त्यांनी भर बैठकीतून व्यासपीठ सोडत तडकाफडकी निघून गेले. यावेळी व्यासपीठावरील सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते थांबले नाही. त्यामुळे शिवसेना-मनसेच्या मनोमिलनच्या बैठकीत पुन्हा एकदा विसंवादाची ठिणगी पडल्याचे चित्र ठळकपणे पहायला मिळाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





