Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूज२ मे रोजी जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल

२ मे रोजी जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल

पुणे । प्रतिनिधी Pune

- Advertisement -

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी लेखी परीक्षेचा निकाल , शनिवारी 2 मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. निकाल ऑनलाईन पद्धतीने दुपारी 1 वाजता जाहीर होईल. निकालाची ऑनलाईन प्रत विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

राज्य मंडळामार्फत गुरुवारी (दि. 30) रात्री उशिरा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. दि. 10 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातून 15 लाख विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. यंदा दहा दिवस लवकर परीक्षा घेण्यात आली. तसेच या वर्षीपासून प्रथमच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डिजिलॉकर मध्ये ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे.

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकाच्या छायाप्रतीसाठी दि. 3 मे ते 15 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल. मंडळाकडून विविध संकेतस्थळावरून निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

विकासाचे

पडसाद: दिशाहीन विकासाचे जळजळीत वास्तव

0
नाशिक - शैलेंद्र तनपुरे - संपादक, दै. देशदूतमुबलक पाणी, उत्तम हवामान, भौगोलिक स्थान आणि मुंबई-पुणे-छत्रपती संभाजीनगर तसेच सुरत या महानगरांशी असलेली कनेक्टिव्हिटी अशा सर्व...