Saturday, April 26, 2025
Homeदेश विदेशCloudburst News : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचे रौद्ररुप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

Cloudburst News : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचे रौद्ररुप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

नवी दिल्ली | New Delhi

दोन दिवसांपूर्वी केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन (Landslide) होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा साधारण २५६ वर पोहचला आहे. तर अनेकजण अद्यापही बेपत्ता आहेत. ही घटना ताजी असतानाच काल रात्री हिमाचलमधील (Himachal) कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत तब्बल ४४ लोक बेपत्ता झाले असून ११ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : टपटप…टपटप…! नव्या संसदेच्या छताला गळती; विरोधी पक्षांकडून Video पोस्ट

हिमाचल प्रदेशातील साधारण दोन जिल्ह्यात ढगफुटीमुळे (Cloudburst) मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाल्याचे समोर येत आहे. या ढगफुटीनंतर कुल्लूच्या रामपूर विभागात समेज जवळील पॉवर प्लांट प्रकल्पातील साधारण १९ लोक बेपत्ता आहेत. तसेच २० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली असून अनेक वाहने पुराच्या पाण्यातून वाहून गेली आहेत. तर मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे.याशिवाय बाकी नऊजण बेपत्ता आहेत.

हे देखील वाचा : केदारनाथला ढगफुटी; मोठे नुकसान होण्याची शक्यता

तसेच मंडी जिल्हा प्रशासनाने सध्या हवाई दलाला प्राचारण केलेले आहे शिवाय घटनास्थळी असलेले स्थानिक नागरिक मदत कार्य करत आहेत. तर हवाई दलासह एनडीआरएफचीही मदत घेण्यात आली आहे. तसेच थलटूखोडमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आता हवाई दल आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवराभोवती ढगफुटीमुळे कुर्पण, समेज आणि गानवी नाल्यांना पूर आला आहे. शिमला जिल्ह्यातील गानवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्ये पूर आला आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १ ऑगस्ट २०२४ – या लोकांसी वेड लागले

दरम्यान, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरुवातीस टिहरीमध्ये मुसळधार पाऊस झाला मग ढगफुटी,यामुळे तेथील दोन नागरिंकाचा मृत्यू झाला. तर केदारनाथ रस्त्यावरही ढगफुटी झाल्याने मुख्य राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग जलमय झाला आहे. त्यामुळे केदारनाथला जाणाऱ्या पायी मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय रामबाडा जवळील मंदाकिनी नदीवरील दोन पूलही वाहून गेले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भारताच्या

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले...