Friday, February 14, 2025
Homeनाशिककेदारनाथला ढगफुटी; मोठे नुकसान होण्याची शक्यता

केदारनाथला ढगफुटी; मोठे नुकसान होण्याची शक्यता

बचाव कार्य सुरु

उत्तराखंड

- Advertisement -

उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बुधवारी रात्री ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे. यात बरेचसे भाविक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या ढगफुटीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

केदारनाथ धामजवळ ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीला भीषण पूर आला आहे. केदारधाम ते गौरीकुंडपर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे डेहराडूनच्या काही भागात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ढगफुटीमुळे केदारनाथ येथील चालण्याच्या काही मार्ग वाहून गेला असल्याचे समजते. त्यामुळे यात्रेकरूंची ये-जा थांबली आहे. गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन आणि एनडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे.

उत्तराखंड इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मैदानी भागात पाणी साचण्याची आणि डोंगराळ भागात भूस्खलनाचीही शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या