Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयCM Devendra Fadnavis : अबू आझमींचे वारीबद्दल वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांनी केली सडकून...

CM Devendra Fadnavis : अबू आझमींचे वारीबद्दल वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांनी केली सडकून टीका, म्हणाले “त्यांना मी…”

मुंबई | Mumbai

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी ‘वारीमुळे (Wari) रस्ता जाम होतो, पण मुस्लीम समाज तक्रार करत नाही. मात्र, मुस्लिमांनी रस्त्यांवर नमाज पठण केले तर तक्रार केली जाते. असे विधान केले आहे. यावरून आमदार अबू आझमी वादात सापडले असून, त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अबू आझमी यांना वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statment) करण्याचा शौक आहे. कारण त्यांना असं वाटतं की, वादग्रस्त वक्तव्य केली की, प्रसिद्धी जास्त मिळते. त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळे मी अशा फाल्तू गोष्टीला उत्तर (Answer) देणार नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.

YouTube video player

अबू आझमी नेमकं काय म्हणाले होते?

सोलापूरमध्ये बोलतांना अबू आझमी म्हणाले की, “आजपर्यंत कधीही कुठल्या मुसलमानाने तक्रार केली नाही की, रस्त्यावर उत्सव का साजरा केला जातो? मी पुण्याहून येत होतो. तेव्हा मला लोकांनी सांगितलं की, पालखी जाणार आहे. त्यामुळे लवकर जा. नाहीतर रस्ता जाम होईल. रस्ता जाम होत आहे. पण आम्ही कधी विरोध केला नाही. मात्र, आमच्या नमाज पठणाच्या वेळी जाणीवपूर्वक या देशात मुसलमानांसाठी जमीन कमी केली जात आहे. मशिदीबाहेर नमाज पठण करु शकत नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं पाच ते दहा मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. आम्ही कुणाची तक्रार करत नाही. आम्ही आमच्या हिंदू बांधवाच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालतो”, असे विधान अबू आझमी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...