Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा साहित्यिकांना सल्ला; म्हणाले, "त्यांनी पार्टी लाईन्सवर..."  

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा साहित्यिकांना सल्ला; म्हणाले, “त्यांनी पार्टी लाईन्सवर…”  

मुंबई | Mumbai

नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात (Akhil Bhartiy Marathi SAhitya Sammelan) विधानपरिषदेच्या उपसभापति आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी (Neelam Gorhe) ‘असे घडलो आम्ही’ या परिसंवादात बोलतांना “ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेवर केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

फडणवीस यांना नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की,”प्रत्येकाने साहित्य संमेलनात (Sahitya Sammelan) बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत. अनेक साहित्यिकांना वाटतं की राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत. मग त्यांनीही पार्टी लाईनवरील कमेंट्स करणं योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात”, असा सल्लाच देवेंद्र फडणवीसांनी दिला.

तर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीके प्रकरणी विचारले असता फडणवीस म्हणाले की,”त्या पक्षात काय चालालयं यावर मी कमेंट करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी थेट बोलणे टाळले. पण सगळ्यांनीच बोलण्याच्या मर्यादा ठेवल्या पाहिजेत असे सांगत, फडणवीस यांनी नाव न घेता गोऱ्हे यांचे कान देखील टोचले.

तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, “आमच्याकडे कोणीही तक्रार केली तर त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो. सध्या चौकशी सुरू आहे. तक्रार झाली म्हणजे, अनियमितता झाली असं म्हणण्याचं कारण नाही, चौकशीत दोषी आढळले तर कारवाई करू”, असे त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...