Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : पुढच्या तीन वर्षांत १ लाख नोकऱ्या, विदर्भासाठी मोठी गुंतवणूक,...

Devendra Fadnavis : पुढच्या तीन वर्षांत १ लाख नोकऱ्या, विदर्भासाठी मोठी गुंतवणूक, मुंबईबाबतही स्पष्टच बोलले; मुख्यमंत्री आठवडा प्रस्तावावरील भाषणात नेमकं काय-काय म्हणाले?

नागपूर | Nagpur

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर (Nagpur) येथे सुरु असून, या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतांना शेरोशायरीने आपल्या भाषणाला सुरुवात करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पुढच्या तीन वर्षात १ लाख २० हजार सरकारी नोकऱ्या देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकारमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रितपणे निर्णय घेत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या (Court) आदेशाच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सातत्याने करत असून, नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील.अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दु:ख होते. आता लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्यास महाराष्ट्र गतीने काम करणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र थांबणार नसून,सकारात्मकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा मांडणार आहोत, असे फडणवीसांनी यावेळी म्हटले.

YouTube video player

पुढे ते म्हणाले की, महायुती सरकारने (Mahayuti Goverment) दोन वर्षात १ लाख २० हजार सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. त्यानंतर आता पुढच्या तीन वर्षात आणखी १ लाख २० हजार नोकऱ्या देणार आहोत. आपण महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेटं तयार केले आहे. त्यामध्ये २०४७ चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे. २०३० चा पहिला टप्पा, २०३५ चा दुसरा टप्पा आणि २०४७ चा तिसरा टप्पा असणार आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, २०२९ ते २०३० दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

भाषणात शेरोशायरीचा वापर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणाची सुरुवात करतांना म्हणाले की, “महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या. कोव्हिडचा काळ आला. अनेक अडचणी आल्या, स्थगिती आल्या. पण या गोष्टी विसरुन जायच्या. आता आपण थांबणार नाही. आमचा प्रयत्न सकारात्मकतेने पुढे जाण्याचा आहे. २०२५ चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. पुढचा काळ आंपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रचनात्मक कार्यातून आपण महाराष्ट्राला वेगाने पुढे नेऊ शकतो. विरोधी पक्ष आहे, सत्तारुढ पक्ष हे जरी असलं तरीही आपण सगळे महाराष्ट्र हिताचा विचार करणारे लोक आहोत. म्हणून मला सांगायचं आहे की अब आगे बढ़ चुकाँपन हूँ मे, पिना था जितना जहर पिना पी चूँका हूँ मै, अब पग नहीं रुकनेवाले, आगे चल चुका हूँ मै, जितना पढना था तुमको पढ चुका हूँ मे, अब आगे बढ़ चुका हूँ मै. असं त्यांनी म्हटले.

… तोपर्यंत मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर देखील आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत भाष्य केले. ते म्हणाले की, “१०६ हुतात्म्यांनी तयार केलेला महाराष्ट्र आहे. मुंबई तोडली जाईल असा विचार करू नये. निवडणूक आली की अशा टीका होतात. सभागृहात सांगतो की, मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा २१ पानांचा अभ्यास सीबीएससीच्या पुस्तकात

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला त्या तत्वाने महाराष्ट्र चालत राहील. महाराष्ट्राला हे तत्त्व मान्य होते. पण देशपातळीवर अनेक संभ्रम होते म्हणून सीबीएससी पुस्तकात यापूर्वी मराठा साम्राज्य व छत्रपती एक पॅरापुरता होता तर मुघलांचा १७ पानांचा होता. आता सीबीएसईने छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा २१ पानांचा इतिहास अभ्यासक्रमात केंद्र सरकारने समाविष्ट केला आहे, असे त्यांनी म्हटले.

विदर्भात तब्बल पाच लाख कोटींची होणार गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणादरम्यान विदर्भासाठी मोठ्या मदतीची घोषणा केली. ते म्हणाले,परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र हा इतर राज्यांच्या तुलनेत अव्वल स्थानी आहे.सरकार सामंजस्य करार करत आहे. मात्र अनेकांना वाटत असेल की, फक्त सामंजस्य करार होत आहेत, त्यावर काही ठोस पावलं उचलली जात नाहीत. तर हे प्रकल्प अंमलात देखील आणले जात आहेत. १५ लाख ७२ कोटींपैकी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक विदर्भात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...