Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रBadlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

Badlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई | Mumbai

बदलापूर (Badlapur) पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर (Girl) झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर गेल्या सात तासांपासून हजारो बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले असून येथील रेल्वे रुळावर आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. अशातच आता या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Badlapur School Case : लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आरोपींना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या घटनेतील आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.तसेच शाळेत अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.त्यासोबतच या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे आदेश शिंदेंनी दिले आहेत.

हे देखील वाचा : Badlapur School Case : बदलापुरात आंदोलनाला हिंसक वळण; नागरिकांकडून शाळेची तोडफोड

दुसरीकडे बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा फडणवीस यांनी दिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...